तालुक्यात काळी-पिवळी आणि ऑटो चालकांची मोठी संख्या आहे. ऑटो चालकांना कोरोना काळापासून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राजकीय बळ मिळावे, कुठल्यातरी मोठ्या संघटनेचा आधार मिळावा म्हणून तालुका काळी-पिवळी आणि ऑटो चालक संघटनेने एकमताने निर्णय घेऊन शिवसेना पक्षात प्रवेश घेतल्याचे मत संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर शहारे यांनी व्यक्त केले. यावेळी संघटनेचे प्रमोद पाल, निकेश झोडे, राजू शहारे, संजय आंबेडारे, विकास बर्वे आणि सदस्य उपस्थित होते. संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह स्थानिक तालुका शिवसेना कार्यालयात तालुकाप्रमुख चेतन दहीकर, जिल्हा सचिव संजय पवार, माजी बाजार समिती संचालक यादोराव कुंभरे, माजी नगरसेवक प्रकाश उईके, सुशील गहाणे, बबन बडवाईक, राजेश कापगते, महेश शहारे उपस्थित होते.
काळी-पिवळी, ऑटो चालक संघटनेचा शिवसेना प्रवेश ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 4:29 AM