महाविद्यालयात आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे नौदल कार्य’ या विषयावरील आयोजित चर्चासत्रात अध्यक्षीय मार्गदर्शनात बोलत ते होते. कार्यक्रमाचे आयोजन इतिहास विभागाद्वारे प्राचार्य डॉ.ललीत जीवानी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी चर्चासत्रात प्रणव चांदीवाले, विजय मेश्राम, प्रियंका बागडे, त्रिपाली डोये, संतोषी नागपुरे, देवेश्वरी उपराडे, टिकेश्वरी चौधरी, रवींद्र डोंगरे, अक्षय पंधरे, स्वामी डोंगरे, आशा लिल्हारे, ममता येरणे, राधेश्याम पाथोडे, रीमा टेंभरे या विद्यार्थ्यांनी चर्चासत्रात भाग घेतला. कार्यक्रमात डॉ.बी.जे. राठोड, प्रा.वाय. एम.थेर, प्रा.डॉ.रामकिशन लिल्हारे यांची उपस्थिती होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डिलेश लिल्हारे, संचालन राहुल बोरकर आभार चित्रा चुटे यांनी मानले. कार्यक्रमच्या यशस्वितेसाठी पुष्पा कुराहे, भारती लिल्हारे, आरती दमाहे, स्वाती बागडे, वैशाली शिवणकर, नेहा भांडारकर, अस्मिता वैद्य, टिकेश्वरी चौधरी, यशस्वी शहारे, रमेश कुमरे, दीपक राऊत, दीपक खोबागडे, प्रीती बन्सोड यांनी सहकार्य केले.
‘मध्ययुगीन नौदलाचे जनक शिवाजी महाराज होते’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 4:25 AM