शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

शेतकऱ्यांसाठी शिवणकरांनी राजकारणात सक्रिय व्हावे-फरांदे

By admin | Published: April 12, 2015 1:23 AM

दिनदलित व शेतकऱ्यांसाठी महादेवराव शिवणकरांनी पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याची गरज आहे.

आमगाव : दिनदलित व शेतकऱ्यांसाठी महादेवराव शिवणकरांनी पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याची गरज आहे. त्यांच्या विदर्भाच्या विकासात सिंहाचा वाटा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनीचे कार्यवाह न.था.फरांदे यांनी केले. ते बनगाव येथील ग्रामोत्थान व जनकल्याण संस्थाव्दारे आयोजित नेत्र तपासणी, दंत रोग तपासणी, रक्तदान आणि माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात मंगळवारी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी महादेवराव शिवणकर, माजी आ.हरिहरभाई पटेल, भेरसिंह नागपुरे, डॉ.बुलाखीदास कलंत्री, जि.प, अध्यक्ष विजय शिवणकर, डॉ. रूचा बाम्हणकर, मधुकर कुकडे, पंचम बिसेन, नरेश माहेश्वरी, कमल बहेकार, तुंडीलाल कटरे, रमेश अग्रवाल, सुखराम फुंडे, बालाराम अग्रवाल, सविता बघेले, उषा हर्षे, देवचंद तरोणे, मनोहर चंद्रिकापुरे, बबलू कटरे, विनोद हरिणखेडे, गंगाधर परशुरामकर, दिनदयाल चौरागडे, टिकाराम मेंढे, मनोज मेंढे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी महादेवरा शिवणकर म्हणाले, सध्या शेतकऱ्यांची स्थिती जैसे थे तसीच आहे. सरकार कोणतेही असो अन्न निर्माता व गरीबांचा विचार करणारी सरकार असावी, जे एक गटातील लोक गोहत्याचा कांगावा करतात त्यांच्याकडे तरी जनावरे आहेत का? प्रतिनिधी ठेकेदार झाले यातून बाहेर पडून लोककल्याणाकडे लक्ष दिले पाहिजे. शेतकऱ्यांची स्थिती शास्त्रयुक्त पध्दतीतून सुधारित करण्यासाठी मागील चार महिन्यापासून शेतात प्रात्यक्षिक सुरु आहे. प्रास्ताविक एम.डी.कटरे यांनी केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा व मान्यवरांचे सत्कार करण्यात आला. शिबिरात २५०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. संचालन प्राचार्य सी.जे. पाऊलझगडे, राष्ट्रगीत सिध्दार्थ डोंगरे व आभार एम.डी.पटले यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्राचार्य पी.आर. पटेल, सी.जी. पाऊलझगडे, संजय शिवणकर, जे.ए.मेश्राम, बी.बी. तिडके, व्ही.एस. दिहारी, व्ही.डी. बिसेन, गावळकर, प्रकाश कापगते, वाय.एन.पाठक, विजय रगडे, मोरेश्वर चापले, तिरथ येटरे, सचिन ढेंगे, मकरंद पांडे, नरेंद्र शिवणकर, देवेंद्र मच्छिरके, प्रफुल ठाकरे, मंगेश चुटे, मुन्ना कटरे व ग्रामोत्थान, जनकल्याण संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)