शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

भरधाव ट्रकच्या धडकेत

By admin | Published: January 28, 2017 12:24 AM

वडसा-कोहमारा राज्य महामार्ग क्रमांक २७५ वरील देऊळगाव शिवारात एका ट्रकने दुचाकीला

दोन दुचाकीस्वार ठार अर्जुनी मोरगाव : वडसा-कोहमारा राज्य महामार्ग क्रमांक २७५ वरील देऊळगाव शिवारात एका ट्रकने दुचाकीला दिलेल्या भिषण धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी सकाळी १० ते १०.३० दरम्यान घडली. मृतकाची नावे सुनील परदेशी तुलावी (१४) रा. गजेगाव (कोरची) व बानसिंग इतवारी कोरेटी (२२) रा.खसोडा (कोरची) अशी आहेत. चोवाराम सुखलुराम राऊत (२५) रा. वाको (कोटगूल) हा जखमी झाला आहे. मृतक सुनील हा अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगावच्या दिनदयाल उपाध्याय आदिवासी आश्रमशाळेत आठव्या वर्गात शिकतो. सुटीच्या दिवशी नातेवाईक विद्यार्थ्यांना भेटायला येतात. यावरुन बानसिंग व चोवाराम हे दुचाकी क्रमांक सीजी ०८, झेड ८०५९ ने गुरुवारी गोठणगावला आले. शाळेतील कार्यक्रम बघून त्यांनी मुक्काम केला. त्यांनी सुनीलला सोबत घेतले. तिघांनीही नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान बघितले. त्यानंतरण एका नातेवाईकाची भेट घेण्यासाठी ते देवलगावला रवाना झाले. देवलगाव शिवारात ट्रक क्र. एमएच ४० वाय ३१३० चा चालक विनोद सुनील सिंग (३२) याने दुचाकीला जबर धडक दिली. भरधाव वेगात असलेला हा ट्रक सुनील व बानसिंग यांचे अंगावरुन गेला. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. चोवारामला किरकोळ जखम झाली. अपघात एवढा भीषण होता की मृतकाच्या डोक्याची कवटी फुटून मेंदू रस्त्यावर पसरला. नवेगावबांध पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले व जखमी झालेल्या चोवारामला नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांचेवर उपचार सुरू आहेत. नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांचेवर उपचार सुरू आहेत. नवेगावबांध पोलिसांनी ट्रक चालक विनोद विरुद्ध कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८ भादंवि तसेच सहकलम १८४ मोटर वाहन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला. नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात मृतकांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. ठाणेदार मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार इंद्रपाल कोडापे तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी) खराब रस्त्यांचे बळी ४हा अपघात म्हणजे खराब रस्त्यांचाच बळी असल्याचा आरोप जि.प.सदस्य किशोर तरोणे यांनी केला आहे. राज्य मार्ग वडसा ते कोहमारादरम्यान दरवर्षी कामे केली जातात. पण ती उखडून जातात. ही कामे निकृष्ट दर्जाची असल्यामुळे वारंवार खड्डे पडतात. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करूनही काही फरक पडला नाही. खड्डेमय रस्त्यामुळेच हा अपघात झाला, असा आरोप तरोणे यांनी केला. कंत्राटदारावर कारवाईची मागणीही होत आहे.