शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
3
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
4
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
5
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
6
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
7
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
8
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
9
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
10
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
11
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
12
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
13
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
14
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
15
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
16
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
17
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
18
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
19
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
20
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन

धक्कादायक...! स्पिरीट व रसायनाच्या माध्यमातून तयार केली जात होती दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2022 10:28 PM

गोंदिया तालुक्यातील खातिया  येथील सुभाष रामचंद्र पालीवाल हा आपल्या घरात बनावट दारू तयार करून विक्री करीत असल्याची माहिती रावणवाडी पोलिसांना मिळताच त्यांनी या माहितीच्या आधारावर खातिया येथे धाड टाकून ३ लाख १३ हजार ८२९ रूपये किमतींची बनावट दारू व बनावट दारू बनविण्याचे साहित्य जप्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खातिया येथील एका कारखान्यावर रावणवाडी पोलिसांनी २ ऑक्टोबरला धाड टाकून मोठ्या प्रमाणात बनावट दारूचा साठा जप्त केला. तसेच, दारू तयार करण्याचे साहित्य सुद्धा जप्त केले. त्यात दारू तयार करण्यास लागणारे रसायन वापरले जात होते. हे रसायनयुक्त दारू प्यायल्याने लोकांना विषबाधा देखील होऊ शकते. स्पिरीट, अल्कोहोलचे रंग फ्लेवर मिक्स करून बाटलीत भरून बनावट लेबल लावून विक्री करीत असल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.गोंदिया तालुक्यातील खातिया  येथील सुभाष रामचंद्र पालीवाल हा आपल्या घरात बनावट दारू तयार करून विक्री करीत असल्याची माहिती रावणवाडी पोलिसांना मिळताच त्यांनी या माहितीच्या आधारावर खातिया येथे धाड टाकून ३ लाख १३ हजार ८२९ रूपये किमतींची बनावट दारू व बनावट दारू बनविण्याचे साहित्य जप्त केले. या प्रकरणात आरोपी सुभाषचंद दिनेशचंद पालीवाल ( ४८ ) रा. कुकापूर, ता. बाह, जि. आग्रा ( उत्तर प्रदेश) ह मु. खातीया, ता. जि. गोंदिया,  राजेश सुनील यादव (२८) रा. जानकी हॉस्पिटलच्या बाजूला, मरारटोली, संदीप आमोद चंद्रिकापुरे (२३) रा. जुने लक्ष्मीनगर, बुद्ध वाॅर्ड, गोंदिया,  तरुण राजेश टेंभुर्णे (२३) रा. जुने लक्ष्मीनगर, चंद्रशेखर वाॅर्ड, गोंदिया  व प्रकाश गोवर्धन अग्रवाल (४७) रा. कामठा ग्रामपंचायतजवळ, कामठा  असे  अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींवर भादंविच्या कलम ३२८ भांदवी सहकलम ६५ (ब) (क)(ड) (फ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश असून ते फरार असल्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी पीसीआर मागण्यात आला. न्यायालयाने ७ ऑक्टोबरपर्यंत या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.  तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील अंभुरे करीत आहेत.

पाच आरोपींचा ७ ऑक्टोबरपर्यंत पीसीआरतालुक्याच्या खातिया येथील सुभाषचंद पालीवाल यांच्या घरात बनावट दारू तयार करून बाजारात विक्री करण्याचा मानस ठेवणाऱ्या त्या बनावट दारूच्या कारखान्यावर रावणवाडी पोलिसांनी २ ऑक्टोबर रोजी धाड टाकून ३ लाख १३ हजार ८२९ रुपयाचा माल जप्त केला. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली. न्यायालयाने या आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 दारू तयार करण्याचे साहित्य केले जप्त

- ३१ बॉक्स मध्ये  ३१०० नग टायगर बँड देशी दारु संत्रीचे पव्वे किंमत १ लाख ८ हजार ५०० रुपये, ३६ बाॅक्समध्ये ३६०० नग रॉकेट देशी दारू संत्राचे पव्वे किंमत १ लाख २६ हजार ७ प्लास्टिक बोरीमध्ये ३३६ नग इंपेरीयल ब्ल्यू इंग्रजी दारुचे पव्वे किंमत ५० हजार ४०० रुपये, ३ प्लास्टिक बोरीमध्ये १४४ नग मॅकडॉल नंबर ०१ इंग्रजी दारूचे पव्वे १६० पव्वे किंमत २३ हजार ४० रूपये, एका प्लास्टिक ड्रममध्ये अंदाजे १५ लिटर स्पिरीट, अल्कोहल किंमत २ हजार रुपये, इंपेरीयल ब्ल्यू इंग्रजी दारुचे झाकण खाली प्लास्टिक बॉटल्स टायगर ब्रँड देशी दारू, रॉकेट देशी दारूचे स्टीकर व इतर साहित्य असा एकूण ३ लाख १३ हजार ८२९ रुपयांचा माल जप्त करण्यात आला.  

 

टॅग्स :liquor banदारूबंदी