शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

गोंदिया जिल्ह्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 9:26 PM

२२ दिवसांच्या कालावधीत गोंदिया जिल्ह्यात ३६०० वर रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्ण संख्येत वाढ झाल्याने यासाठी उपयुक्त समजल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आहे. मागील सात आठ दिवसांपासून हीच स्थिती कायम आहे.

ठळक मुद्देरुग्णांच्या संख्येत वाढीमुळे तुटवडाशासकीय रुग्णालयात मोजकाच साठा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकडयात सातत्याने वाढ होत आहे. २२ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात ३६०० वर रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्ण संख्येत वाढ झाल्याने यासाठी उपयुक्त समजल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आहे. मागील सात आठ दिवसांपासून हीच स्थिती कायम आहे.

कोरोना विषाणू  फुफ्फुसाची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता प्रभावित होते. फुफ्फुसावरील कोरोना विषाणू संसर्ग वाढत गेल्यास रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. परिणामी शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाटयाने कमी होवून रुग्णाचा मृत्त्यू होतो. फुफ्फुसातील संसर्ग थांबविण्यासाठी सध्या रेमडेसिव्हीर या इंजेक्शनचा वापर केला जात आहे. त्यामुळे या इंजेक्शनची मागणी मोठया प्रमाणात आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. तर कोरोना बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण सुध्दा वाढले आहे. शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालय सुध्दा हाऊस फुल आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.२१) पुन्हा सहा खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी दिली आहे. अशात कोविडच्या गंभीर रुग्णावर उपयुक्त समजल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मागणी मोठया प्रमाणात वाढली आहे. सद्यस्थितीत गोंदिया येथे दररोज पाचशे इंजेक्शनची मागणी आहे. पण त्या तुलनेत कंपन्याकडून पुरवठा होत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत शहरातील सहा खासगी रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केला जात आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयाकडून सुध्दा रेमडेसिव्हीर या इंजेक्शनची मागणी वाढलीे आहे. पंरतू गोंदियासह इतर जिल्ह्यात सुध्दा कोरोना बाधितांची संख्येत वाढ होत असल्याने तेथे देखील या इंजेक्शनची मागणी वाढली आहे.

शासकीय रुग्णालयात मोजकाच साठायेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच शहरात पाच सहा कोविड केअर सेंटर असून येथे सुध्दा दाखल असलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात आहे. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सद्यस्थितीत केवळ ४० रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध आहेत.जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता मेडिकलने पुन्हा दोन हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मागणी केली आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात सुध्दा हे इंजेक्शन उपलब्ध नसल्याची माहिती आहे.

तुटवडयामुळे किमतीत वाढकोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने रेमडेसिव्हीर या इंजेक्शनची मोठया प्रमाणात मागणी वाढली आहे. या इंजेक्शनची मुळ किमत ४ हजार रुपये आहे. मात्र काही औषध विक्रेते या संधीचा फायदा घेत या इंजेक्शनची सात ते आठ हजार रुपयांना विक्री होत असल्याची ओरड वाढली आहे.

विक्रेते म्हणतात आठ दिवसात येणार साठाशहरातील औषध विक्रेत्यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा असून कंपन्याकडून पुरवठा होत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. सध्या स्थितीत गोंदिया येथील औषध विक्रेत्यांकडे १० ते १५ रेमडेसिव्हीर इंजेक्शन सुध्दा मिळणे कठीेण आहे. मात्र यासंदर्भात कंपन्याशी बोलणे सुरु असून येत्या आठ दिवसात या इंजेक्शनचा साठा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा मागील आठवडाभरापासून तुटवडा आहे.या इंजेक्शनला वाढलेली मागणी लक्षात घेवून पुरवठा करणाºया कंपनीकडे मागणी केली आहे. येत्या पाच सहा दिवसात या इंजेक्शनचा स्टॉक उपलब्ध होईल. मात्र गोंदिया शहरात या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू नाही.- उत्पल शर्मा, अध्यक्ष केमिस्ट अन्ड ड्रगिस्ट असोसिएशन गोंदिया.कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दोन हजार रेमडेसिव्हीर या इंजेक्शनची मागणी केली आहे. सद्यस्थितीेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ४० इंजेक्शन उपलब्ध आहे. तसेच कोरोनावर उपचारासाठी उपयुक्त समजल्या जाणाºया इतर गोळया आणि इंजेक्शन सुध्दा उपलब्ध आहेत.-डॉ. व्ही.पी.रुखमोडे, विभाग प्रमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस