लोकमत न्यूज नेटवर्क्नेगोंदिया : केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला मोठमोठी आश्वासने देऊन ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले. मात्र मागील चार वर्षांत यापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. भाजप सरकारच्या काळात शेतकरी, सर्वसामान्य जनता, युवक हे सारचे त्रस्त आहेत. त्यामुळे जनतेला ‘अच्छे दिन’ येणारची खोटी स्वप्ने दाखविणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन खा. प्रफुल्ल पटेल यांनी येथे केले.भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, पीरिपाचे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ एकोडी येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते.या वेळी माजी आ. दिलीप बन्सोड, जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, जि.प.सदस्य राजलक्ष्मी तुरकर, प्रदेश सदस्य मनोहर चंद्रिकापुरे, डॉ. अविनाश काशिवार, हिरालाल चव्हाण, छाया चव्हाण, रजनी गिऱ्हेपुंजे, यदवती उईके, गजानन परशुरामकर, सा.का.अल्लाउद्दीन राजानी, आनंद इळपाते, धनलाल मानवटकर, उपस्थित होते.पटेल म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांना कर्जमाफीची घोषणा फडणवीस सरकारने केली. मात्र आॅनलाईन आॅफ लाईनच्या तिढ्यामुळे अद्यापही शेतकरी कर्जमुक्त झाला नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चासह दीडपट मोबदला देण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. मात्र ते आश्वासन सुध्दा फोल ठरले आहे.बेरोजगार युवकांच्या हाताला काम नाही. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी झाले नाही. डिझेल, पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. २०१४ पासून ओबीसी विद्यार्थ्याना शिष्यवृत्तीचे वाटप झाले नाही. देशात नोटबंदी करुन सर्व सामान्य जनतेला लाईनमध्ये उभे ठेवण्याचे काम या सरकारने केले. शेतकऱ्यांना अद्यापही धानाच्या बोनसची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी बेजार झाला आहे.आघाडी सरकारने २००८ मध्ये शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले होते. त्यावेळी आॅनलाईन आॅफलाईनचा तिढा निर्माण न करताच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला होता. मात्र आता केंद्र व राज्य सरकार सर्वच आघाड्यांवर फेल ठरले आहे. त्यामुळे अशा विश्वासघातकी सरकारला धडा शिकविण्याची हीच योग्य वेळ असल्याचे ते म्हणाले.
खोटी स्वप्ने दाखविणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:50 AM
केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला मोठमोठी आश्वासने देऊन ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले. मात्र मागील चार वर्षांत यापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. भाजप सरकारच्या काळात शेतकरी, सर्वसामान्य जनता, युवक हे सारचे त्रस्त आहेत.
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : शेतकरी कर्जमुक्त झालाच नाही