शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

देशात घुसखोरी करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 5:00 AM

गोंदिया येथे सर्व जागृत राष्ट्रभक्त नागरिक समितीतर्फे या कायदाच्या समर्थनार्थ शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत नागरिक मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. देशाच्या सन्मानाला कुठलाही धक्का बसू देणार नाही, शिवाय यासाठी कुठलाही समझोता करणार नाही, भारत देश म्हणजे धर्मशाळा नाही. देशात घुसखोरी करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवा असा सूर या रॅलीतून उमटला.

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ रॅली : हजारो नागरिकांचा सहभाग, सर्व जागृत राष्ट्रभक्त नागरिक समितीलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) विरोधात देशभर आंदोलन केले जात आहे. बुधवारी (दि.२५) गोंदिया येथे सर्व जागृत राष्ट्रभक्त नागरिक समितीतर्फे या कायदाच्या समर्थनार्थ शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत नागरिक मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. देशाच्या सन्मानाला कुठलाही धक्का बसू देणार नाही, शिवाय यासाठी कुठलाही समझोता करणार नाही, भारत देश म्हणजे धर्मशाळा नाही. देशात घुसखोरी करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवा असा सूर या रॅलीतून उमटला.लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात सीएए आणि एनआरसी हा कायदा पारित झाला. त्यानंतर या कायदाबाबत नागरिकांमध्ये चुकीचा भ्रम निर्माण केला जात आहे. त्यामुळे ठिकठिकाणी या विरोधात आंदोलन केले जात आहे.मात्र हा कायदा राष्ट्रहित जोपसणारा असून यात कुठलेही गैर नाही, त्यामुळे या कायद्याच्या समर्थनार्थ गोंदिया येथे बुधवारी सर्व जागृत राष्ट्रभक्त नागरिक समितीतर्फे रॅली काढण्यात आली.सकाळी ९ वाजता सिव्हील लाईन येथील हनुमान मंदिर परिसरातून रॅलीला सुरूवात झाली. त्यानंतर ही रॅली नेहरू चौक, गोरेलाल चौक, दुर्गा चौक, चांदनी चौक, नगर परिषद मार्गे गांधी चौक, जयस्तंभ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहचली. भारत मातेची प्रतिमा, भव्य राष्ट्रध्वज, भगवे झेंडे आणि देशभक्तीच्या नाऱ्यानी संपूर्ण शहर दुमदुमले.या रॅली दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक नितीन सावंत, उपनिरीक्षक संतोष सपाटे यांच्या नेतृत्त्वात चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यानंतर या रॅलीचे सभेत रुपांतर झाले. जयस्तंभ चौकातील नवीन प्रशासकीय इमारतीसमोर सभा घेण्यात आली.या वेळी सिंधू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवानदास सदवानी यांनी पाकिस्तान, बांग्लादेश व अफगानिस्तान येथे हिंदू धर्मियांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतरण केले जात आहे. भारतात अल्पसंख्याक समाजाला स्वतंत्रता आहे. मात्र या तीन देशात वेगळेच चित्र आहे. भारत हा धर्मशाळा नाही. घुसखोरांना देशात जागा दिली जाणार नाही. राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणे, पोलिसांवर हल्ला करणे, राष्ट्रच्या नावावर विद्रोहाची भाषा करणाºयांची गय केली जाणार नाही. ही रॅली देशाच्या सन्मानार्थ असून दगडफेक करणाºयांवर कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले.अ‍ॅड. संदीप जैन म्हणाले, भारताच्या फाळणी दरम्यान पाकिस्तानमध्ये २३ टक्के गैर मुस्लिम होते. ती ३ टक्क्यांवर आली आहे. तर बांग्लादेशात ३० टक्केवरुन ८ टक्के आणि अफगानिस्तानमध्ये २२ टक्केवरुन ३ टक्के वर आली आहे. त्यामुळे यात नेमकी घट कशामुळे झाले हे नागरिक गेले कुठे की त्यांचे धर्मातंरण करण्यात आले. नागरिकता संशोधन विधेकयकात काहीच गैर नसून देशवासीयांना घाबरण्याची गरज नाही. केवळ घुसखोरांना पळवून लावण्याची गरज असल्याचे सांगितले. दलजिसिंह खालसा म्हणाले, देशाची फाळणी होण्याची वेळ पुन्हा येऊ नये. देशाच्या फाळणीचे परिणाम आणि यातना यापूर्वीच भोगल्या आहेत. नागरिकता संशोधन कायद्याचा विरोध कशासाठी हे समजण्यापलिकडे आहे. त्यामुळेच समर्थनार्थ निघणाऱ्या रॅलीवर फुलांचा वर्षाव होत आहे तर विरोधात निघणाऱ्या रॅलीवर दगडफेक होत असल्याचे सांगितले. कवि रमेश शर्मा म्हणाले आपल्या देशात किती तरी घुसखोर आले असून त्यांना बाहेर काढण्याची गरज असल्याचे सांगितले.रॅलीत खा. सुनील मेंढे, आ.विनोद अग्रवाल, आ. डॉ. परिणय फुके, आ. विजय रहांगडाले, माजी आ. रमेश कुथे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, डॉ. प्रशांत कटरे, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, न.प. उपाध्यक्ष शिव शर्मा, रचना गहाणे, नगरसेवक भरत क्षत्रिय, दिनेश दादरीवाल, अनिल हुंदानी, राजू वालिया, भाजपा शहर अध्यक्ष सुनील केलनका, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष पंकज रहांगडाले, सुनील तिवारी, अमित शुक्ला, भरत शुक्ला, भावना कदम, डॉ. सुवर्णा हुबेकर, मौसमी सोनछात्रा, हेमलता पतेह, दिलीप गोपलानी, जितेंद्र पंचबुद्धे, अफसाना पठान, दीपक बोबडे, नेहा नायक, राजू कुथे, धर्मेश अग्रवाल, लोकेश यादव, डॉ. विकास जैन, संजय जैन, हर्षल पवार, अ‍ॅड. ओमप्रकाश मेठी, अंकित कुलकर्णी, मुन्ना यादव, कुशल अग्रवाल, छैलबिहारी अग्रवाल, अभय अग्रवाल, दीपक कदम, अरुण अजमेरा, दिव्या भगत, धर्मिष्ठा सेंगर, तपस्या सेंगर, दुर्गेश रहांगडाले, अ‍ॅड. रंजिता शुक्ला, गुड्डू चांदवानी, ऋषिकांत साहू, श्रीनिवास मुंदडा, जयंत शुक्ला, शशि इसरका, सतीश राठी, राम कुंदनानी, मनोहर वालेचा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह बालकृष्ण बिसेन, वसंत ठाकुर, राजू नोतानी, सचिन चौरसिया, संदीप श्रीवास, दिलीप गुप्ता, योगेश पशीने,मोंटू पुरोहित, दिव्यांग धर्मराज काले, विक्की यादव, अमित यादव, अजय यादव, सनत मुरकुटे, अर्चना अग्रवाल, महेंद्र मिश्रा, अजय ब्राह्मणकर, अर्चना शर्मा, कविता शर्मा, शीतल रहांगडाले, विश्व हिन्दूसभाचे हरीश अग्रवाल, शोभा भारद्वाज, वंदना पाठक, ऋषभ यादव, प्रकाश सलूजा,नरेश लालवानी, दिलीप कुंदवानी, अनिल भगतानी, गुड्डू उके यांचा सहभाग होता. संचालन सुषमा यदूवंशी यांनी केले तर आभार माधव गारसे यांनी मानले.देशाच्या विकासासाठी सीएए आवश्यकरॅली आणि सभेच्या समारोपानंतर सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ राष्टÑपती, पंतप्रधान व गृहमंत्र्यांच्या नावे निवेदन उपविभागीय अधिकाºयांना देण्यात आले. या निवेदनातून देशाच्या विकासासाठी सीएए आणि एनआरसी हे दोन्ही कायदे आवश्यक आहे. मात्र काहीजण या विरोधात नागरिकांमध्ये भ्रम निर्माण करुन देशात अराजकतेचे वातावरण निर्माण करीत आहेत.

टॅग्स :Morchaमोर्चा