शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

साहेब, काही करा; पण एक रेमडेसिविर इंजेक्शन मिळवून द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 5:00 AM

रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयातील बेडसुद्धा हाऊसफुल झाले असून काही रुग्णालयात तर वेटिंग आहे. रुग्णांना दाखल करण्यासाठी लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पत्रकार या सर्वांनाच फोन करून साहेब काही होत असेल तर पाहा ना, माझ्या वडिलाला दाखल करायचे आहे, अशी विनंती करणारे फोन येत आहे. पण शासकीय व खासगी रुग्णालयातसुद्धाजागा नसल्याने त्यांचेसुद्धा काहीच चालत नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देरुग्णांच्या नातेवाइकांची विनवणी : रुग्णालयात मिळेना, रुग्णालयातून इंजेक्शन कसे जातात बाहेर? प्रशासन घेणार दखल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : साहेब माझी आई रुग्णालयात दाखल आहे, डॉक्टर म्हणतात रेमडेसिविर इंजेक्शन लावावे लागेल. सायंकाळपर्यंत किमान एकतरी रेमडेसिविर इंजेक्शन आणून द्या, असे सांगितले आहे. पण मेडिकलमध्ये इंजेक्शन घेण्यासाठी गेलो पण ते म्हणतात स्टॉक नाही, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वितरण झाल्यानंतर ते उपलब्ध होईल असे सांगतात. मात्र आईची प्रकृती खालावत आहे. तिला किमान एक तरी रेमडेसिविर इंजेक्शन मिळवून द्या साहेब, अशी विनवणी करणारे फोन शनिवार दिवसभर येत होते. अशी बिकट स्थिती सध्या जिल्ह्यात निर्माण झाली आहे. मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. आठ दिवसात ८,३८५ बाधितांची नोंद झाली आहे. तर सात दिवसात ११७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयातील बेडसुद्धा हाऊसफुल झाले असून काही रुग्णालयात तर वेटिंग आहे. रुग्णांना दाखल करण्यासाठी लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पत्रकार या सर्वांनाच फोन करून साहेब काही होत असेल तर पाहा ना, माझ्या वडिलाला दाखल करायचे आहे, अशी विनंती करणारे फोन येत आहे. पण शासकीय व खासगी रुग्णालयातसुद्धाजागा नसल्याने त्यांचेसुद्धा काहीच चालत नसल्याचे चित्र आहे. कोरोना बाधित गंभीर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर खासगी कोविड रुग्णालयात दाखल रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन लिहून दिले जात आहे. मात्र रेमडेसिविर इंजेक्शनचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे याचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून सर्व वितरकांना आणि खासगी कोविड रुग्णालयांना याचा पुरवठा केला जात आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या अधिक असून त्या तुलनेत रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा होत नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची मोठी परवड होत आहे. ही परवड पाहून कुणाचेही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाही, अशी स्थिती आहे. रुग्णालयातून इंजेक्शन बाहेर कसे?जिल्ह्यात सध्या कोरोनाचा उद्रेक झाला असून रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडेसिविर इंजेक्शन मेडिकलमध्येसुद्धा मिळत नसले तरी खासगी रुग्णालयातून रेमडेसिविर इंजेक्शन बाहेर येत असून एका इंजेक्शनची १३ ते २० हजार रुपयांनी विक्री केली जात आहे. रुग्णालयातून रेमडेसिविर इंजेक्शन कसे बाहेर येत आहे, हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. यांच्यावर कारवाई करणार काेण? सध्या मेडिकल आणि रुग्णालयामध्येसुद्धा रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्याचे चित्र आहे. मात्र दुसरीकडे मार्केटमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन १३ ते २० हजार रुपयांना उपलब्ध करून दिले जात आहे. तर हे इंजेक्शन उपलब्ध करून देणारेसुद्धा काही रुग्णालयांशी संबंधित असल्याची माहिती आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची लूट करणाऱ्यांवर कारवाई केव्हा करण्यात येणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस