बाराभाटी : ग्रामीण भागातील जनता ही शेती आणि मजुरी यांवरच आपला उदरनिर्वाह करीत असते. मजुरी करणारे नागरिक हे प्रसंगानुरूप मजुरीने कामावर जातात. उन्हाळ्यात आपल्या भागात तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू होते, तर काही भागांतील गावांत सन २०१९ व २०२० मध्ये तेंदूपत्ता संकलन करून मजुरांनी विक्री केली. मजुरी मिळाली; पण शासनाकडून बोनस मात्र अद्यापही मिळाला नाही.
सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे. अशातच ग्रामीण भागात रोजीरोटी करणारे मजूर यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. शासनाची मदत ही कायमस्वरूपी नाही. मजुरी करावीच लागते आणि मजुरी केली तर तीसुद्धा वेळेवर मिळत नाही. २०१९ व २०२० चे तेंदूपत्ता संकलनाचे बोनस अद्यापही मिळाले नाही. त्यामुळे ते न मिळण्यामागील कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. वन विभागाने याची दखल घेऊन बोनस देण्याची मागणी बोळदे, कवठा, येरंडी-देवलगाव, डोंगरगाव, बाराभाटी, कुंभीटोला, ब्राह्मणटोला या गावांतील नागरिकांनी लवकरात लवकर बोनस देण्याची मागणी केली आहे.
........कोट
आम्ही तेंदूपत्ता संकलन करून शासनाला विक्री केली; पण दोन वर्षांचे पैसे मिळाले; पण बोनसचा अद्यापही पत्ता नाही.
- डिलक्स सुखदेवे, तेंदूपत्ता संकलन मजूर, बोळदे
............
मागील दोन वर्षांपासून बोनस दिला नाही. चेकर, मुन्शी यांना विचारले तर काही सांगतच नाहीत. कोरोनाच्या काळीही बोनसची मदत मिळाली नाही.
- शेलेष रामटेके, तेंदूपत्ता मजूर.
..........