शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
3
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
6
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
7
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
8
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
9
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
10
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
11
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
13
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
14
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
15
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
16
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
17
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
19
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
20
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम

साहेब, कोरोनाने नव्हे, तर पीपीई कीटने मरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 5:00 AM

कोविड वॉर्डात रुग्णसेवा देणाऱ्या प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांनाही सहा ते सात तास पीपीई कीट परिधान करावी लागत आहेत. त्यामुळे एकदा पीपीई कीट परिधान केल्यावर या कर्मचाऱ्यांना पाणीदेखील पिणे शक्य होत नाही. दुसरीकडे जिल्ह्यातील तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. पीपीई कीटचे कापड प्लास्टिकच्या आवरणाने आच्छादलेले असल्याने त्यातून वाराही जात नाही आणि पाणीही जात नाही.

ठळक मुद्देवाढत्या तापमानामुळे समस्या : पण सेवेत खंड नाही

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पीपीई कीटचाही वापर वाढला आहे. मात्र, या कीटचा अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. अशातच तापमानाचा पारा वाढल्याने पीपीई कीट परिधान करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहा ते सात तास प्यायला पाणीही मिळत नाही. अशा परिस्थितीत या कर्मचाऱ्यांना कोरोना नव्हे, तर पीपीई कीटच जीवघेणी ठरत आहे. पण डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी याची तक्रार न करता रुग्णांना अखंडितपणे सेवा देत आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. रुग्णालयात दाखल कोविड रुग्णांची संख्या वाढल्याने पीपीई कीटचाही वापर वाढला आहे. कोविड वॉर्डात रुग्णसेवा देणाऱ्या प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांनाही सहा ते सात तास पीपीई कीट परिधान करावी लागत आहेत. त्यामुळे एकदा पीपीई कीट परिधान केल्यावर या कर्मचाऱ्यांना पाणीदेखील पिणे शक्य होत नाही. दुसरीकडे जिल्ह्यातील तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. पीपीई कीटचे कापड प्लास्टिकच्या आवरणाने आच्छादलेले असल्याने त्यातून वाराही जात नाही आणि पाणीही जात नाही. पण याची कुठलीही तक्रार न करता डॉक्टर व आरोग्य कर्मचारी आपलीे सेवा नियमितपणे देत आहे.  

आरोग्य कर्मचारी त्रस्त

 कोरोना चाचणी करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेक तास उभे राहावे लागते. सुरक्षेसाठी पीपीई कीट परिधान करणे अनिवार्य आहे. मात्र, या कीटमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो, कारण या कीटमधून हवा अजिबात शरीरापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे सलग एकाच कर्मचाऱ्यांकडे हे काम न देता टप्प्याटप्प्याने देण्यात यावे. शासनाने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देऊन समस्या सोडविण्याची गरज निर्माण झाली आहे. जेणेकरून कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल. पीपीई कीट परिधान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात घाम येणे, घशाला कोरड पडणे, हातापायाला व्रण येणे, चक्कर येणे, युरिन इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन, थकवा, आदी समस्यांना समोरे जावे लागत आहे.  

पीपीई कीट परिधान केल्यानंतर घाम येणे, घशाला कोरड पडणे यासह चक्कर येणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाचा पारा वाढल्याने या समस्यांमध्ये वाढ झाली असली, तरी वैद्यकीय कर्मचारी रुग्ण सेवेला प्राधान्य देत आहेत. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी रुग्ण सेवेला प्राधान्य देत आहेत. - डॉ. अमरिश मोहबे, जिल्हा शल्य चिकित्सक, गोंदिया. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर