लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अनेक ग्राहकांनी जवळची बँक आपले खाते गावाजवळील बँकेत उघडले आहे. यात काही वृध्दांचा देखील समावेश आहे. बँकेच्या नियमानुसार पती-पत्नीचे एकत्रित खाते असल्यास ते विड्राल करण्यासाठी दोघे उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे वृध्द पती-पत्नी पैसे काढण्यासाठी बँकेत गेल्यानंतर त्यांच्या वयाचा आणि आजाराचा विचार करता त्यांचे काम प्राधान्याने बँक कर्मचाऱ्यांनी करणे अपेक्षित आहे. मात्र त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करित त्यांना तासन तास बँकेबाहेर ताटकळत बसवून ठेवले जात असल्याचा प्रकार गुरूवारी (दि.२५) पांढरीबोडी येथील बँकेत उघडकीस आला. त्यामुळे या वृध्द दाम्पत्यांवर साहेब माणुसकीच्या नात्याने तरी आमची दखल घ्या अशी विनंती करण्याची वेळ आली आहे.गोंदिया तालुक्यातील पांढराबोडी येथे बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या बँकेत सध्या पीक कर्जाची उचल करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी आहे. गुरूवारी दोन वृध्द दाम्पत्य आपल्या कुटुंबीयांसह खात्यातील पैसे काढण्यासाठी येथील बँकेत आले होते. यापैकी एक वृध्द दिव्यांग असून त्याचे कुटुंबातील व्यक्ती त्यांना घेवून बँकेत आले होते. तर दुसरे वृध्द दुलीचंद सेवईवार हे आजारी असल्याने ते सुध्दा पत्नीसह बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते. मात्र येथील बँक कर्मचाऱ्यांनी या दोन्ही वृध्दांची दखल घेवून त्यांना त्वरीत विड्राल देऊन अथवा त्यांचे काम प्राधान्याने करुन देणे अपेक्षित होते. मात्र तालुक्यातील बलमाटोला येथून बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या वृध्द आणि आजारी ग्राहकांची बँक कर्मचाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांना बँकेच्या पायऱ्यावर दोन ते तीन तास ताटकळत राहावे लागले. बँक कर्मचाऱ्यांच्या जेवणाची वेळ ही ३.३० वाजताची आहे. मात्र ४ वाजल्यानंतर बँकेचे गेट उघडून ग्राहकांना आत सोडण्यात आले नाही. त्यामुळे बलमाटोला येथून आलेल्या दोन्ही वृध्दांना बँकेच्या पायऱ्यांवर बसून आपल्या नंबर येण्याची प्रतीक्षा करावी लागली. यापैकी एका वृध्दाची प्रकृती तर फार गंभीर होती. त्याच्या पत्नीने ही बाब बँक कर्मचाऱ्यांना सांगितली तरी त्यांनी याची दखल घेतली नाही. बँके बाहेर असलेल्या ग्राहकांनी सुध्दा या वृध्दाची दखल घेत त्यांची आस्थेने विचारपूस केली. मात्र बँकेच्या कर्मचाऱ्यांना या वृध्दांची दखल घेणे आवश्यक वाटले आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी किमान माणुसकीच्या नात्याने तरी या वृध्दांची दखल घेवून त्यांचे काम प्राधान्याने करुन देणे अपेक्षित होते. अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची फरफट कायममुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्वच बँकांना पीक कर्जाचे वाटप करण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरु नये अशा सूचना केल्या आहेत. मात्र यानंतर यानंतरही राष्ट्रीयकृत बँकाकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. हाच प्रकार पांढराबोडी येथील बँकेत सुरु आहे. मागील पाच दिवसांपासून शेतकरी पीक कर्जाची उचल करण्यासाठी बँकेत जात आहेत. मात्र त्यांना विविध कारणे सांगून दररोज परत पाठविले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेवून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
साहेब माणुसकीच्या नात्याने तरी आमची दखल घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 5:00 AM
एक वृध्द दिव्यांग असून त्याचे कुटुंबातील व्यक्ती त्यांना घेवून बँकेत आले होते. तर दुसरे वृध्द दुलीचंद सेवईवार हे आजारी असल्याने ते सुध्दा पत्नीसह बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते. मात्र येथील बँक कर्मचाऱ्यांनी या दोन्ही वृध्दांची दखल घेवून त्यांना त्वरीत विड्राल देऊन अथवा त्यांचे काम प्राधान्याने करुन देणे अपेक्षित होते. मात्र तालुक्यातील बलमाटोला येथून बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या वृध्द आणि आजारी ग्राहकांची बँक कर्मचाऱ्यांनी दखल घेतली नाही.
ठळक मुद्देपैसे विड्राल करण्यासाठी वृध्दांची फरफट : बँकाकडून होतेय दुर्लक्ष, वरिष्ठ अधिकारी घेणार का समस्यांची दखल