शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

सरपंचांनी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 21:51 IST

दिशाभूल करणाऱ्या नेत्यांपासून सावध राहा. शासन शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी विविध चांगल्या योजना राबवित आहे. त्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत सरपंचांनी पोहोचवावा, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : सरपंच-उपसरपंच सत्कार कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा: दिशाभूल करणाऱ्या नेत्यांपासून सावध राहा. शासन शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी विविध चांगल्या योजना राबवित आहे. त्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत सरपंचांनी पोहोचवावा, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य साधून आ. विजय रहांगडाले यांच्या पुढाकाराने करियर मार्गदर्शन व नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात ते अध्यक्षीय स्थानावरून मार्गदर्शन करीत होते.उद्घाटन आमदार डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख म्हणून नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी आ. खोमेश्वर रहांगडाले, सीता रहांगडाले, उमाकांत हारोडे, कृऊबासचे सभापती चिंतामन रहांगडाले, उपसभापती विजय डिंकवार, न.प. उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर, विश्वजित डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी सरपंच, उपसरपंच यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. या वेळी आ. विजय रहांगडाले यांनी अटलबिहारी बाजपेयी यांनी दाखविलेल्या पंचायतराज योजनेचे पालन करुन गावाचा विकास करण्याचे स्वप्न साकार व्हावे, यासाठी आज आम्ही सुशासन दिनानिमित्त संपूर्ण क्षेत्रातील सरपंच-उपसरपंच यांचा सत्कार व मेळावा घेत आहोत. हा राजकारणाचा भाग नसून माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या सुराज्याचे स्वप्न साकार व्हावे, यासाठी सदर कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करीत असल्याचे आ. रहांगडाले यांनी सांगितले. याप्रसंगी उपस्थित अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले.संचालन माजी जि.प. उपाध्यक्ष मदन पटले यांनी केले. आभार नगराध्यक्ष सोनाली देशपांडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. वसंत भगत, संजयसिंह बैस, तुमेश्वरी बघेले, डॉ.बी.एस. रहांगडाले, पवन पटले, रमणीक सोयाम, भाऊराव कठाणे, सलाम शेख, छत्रपाल तुरकर, पंकज रहांगडाले, डॉ. रामप्रकाश पटले, गौरीशंकर पारधी, महेंद्र बघेले, बालू समरीत, संजय पारधी, संजय खियानी, राजेश मलघाटे, पवन लांजेवार, टूंडीलाल शरणागत, संध्या भरणे, यशवंत कांबडी, सुनील बन्सोड, अनूप बोपचे, मधू टेंभरे, प्रभू सोनवाने, ललीत परिहार, रवी चामट, राजेश रहांगडाले, कैलाश कटरे, पुरनलाल पटले, गिरीश बांते, श्वेता मानकर, अशोक असाटी, विजय बन्सोड, राखी राजेश गुणेरिया, संतोष मोहने, राजेश गुणेरिया, अनिता अरोरा, भावना चवळे, तेजराम चव्हाण, श्रावण रहांगडाले, भूमेश्वर रहांगडाले, दिनेश चोभरे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Rajkumar Badolayराजकुमार बडोले