लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : वडिलांचे छत्र हिरावल्याने आई व बहिणीची जबाबदारी पार पाडण्यासाठी भाऊ झटू लागला. बहिणीच्या लग्नासाठी ‘पै न पै’ जोडणाऱ्या भावाला आजार जडला व त्यानेही जगाचा निरोप घेतला. त्यामुळे येथील मेश्राम परिवारावर दु:खाचे सावट पसरले आहे.राकेश शंकर मेश्राम (२४) हा सुशील व स्वभावाने गावात सर्वांचा आवडता होता. मागील काही वर्षापुर्वी वडील शंकर यांचे अपघाती निधन झाले. ऐन उमेदीच्या काळात पतिने साथ सोडल्याने आई वंदनावर कुटुंबाचा भार आला. पतीच्या निधनाचे दु:ख पदराला बांधून त्यानी दोन मुलांचा सांभाळ करुन त्यांना सुसंस्कारीत केले. मुलगा राकेश समोर आलेला कामधंदा करुन आईला मदत करु लागला. लहान बहीण ममता वयात आल्याने तिच्यासाठी चांगले स्थळ शोधून तिचे लग्न उकरण्याचा बेत या मायलेकांनी केला.साकोली येथे ममताची सोयरीक झाली. येत्या २४ एप्रिल रोजी बहिणीच्या लग्नाची तारीख निश्चित झाली. लग्न कार्यासाठी पैशांची जमवाजमव करण्यासाठी एका भावाचे कर्तव्य म्हणून राकेश पैसा कमविण्याच्या हेतूने विशाखापट्टनम येथे काम करण्यासाठी गेला. आपल्या बहिणीचे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतुनी भावानी आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले. मोठ्या भावाचे कर्तव्य पार पाडावे असा त्याच प्रण होता. परंतु हे नियतीला मान्य नव्हते. एकाएकी राकेशची प्रकृती विशाखापट्टनम येथे बिघडल्याने त्याला साकोली येथे खाजगी दवाखान्यात भर्ती केले.प्रकृतीत सुधारना न झाल्याने रविवारी (दि.३१) रात्री नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भर्ती करण्यात आले. परंतु अखेर मंगळवारी (दि.२) सकाळी ८ वाजता राकेशची प्राणज्योत मावळली. दुपारी गावातील नाल्यावर हजारोंच्या उपस्थितीत राकेशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या अभागी मातेला यापुर्वी ऐन उमेदीच्या वयात पतीला मुकावे लागले. तर आता कमावता मुलगा एकाएकी सोडून गेल्यामुळे दु:खाचा पहाड कोसळला आहे.
बहिणीच्या लग्न कार्यासाठी आर्थिक तजवीज करणाऱ्या भावाचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 11:59 PM
वडिलांचे छत्र हिरावल्याने आई व बहिणीची जबाबदारी पार पाडण्यासाठी भाऊ झटू लागला. बहिणीच्या लग्नासाठी ‘पै न पै’ जोडणाऱ्या भावाला आजार जडला व त्यानेही जगाचा निरोप घेतला. त्यामुळे येथील मेश्राम परिवारावर दु:खाचे सावट पसरले आहे.
ठळक मुद्देएकाएकी जडला आजार : मेश्राम परिवारावर दु:खाचे सावट