गोंदिया : कोरोनाचा संसर्ग हळूहळू आटोक्यात येत असून, सद्यस्थितीत आठपैकी गोंदिया आणि आमगाव तालुक्यातच कोरोनाचे एकूण सात ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर सहा तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. ही जिल्हावासीयांसाठी निश्चितच दिलासादायक बाब आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने गुरुवारी (दि. २३) १४५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ७५ जणांची आरटीपीसीआर, तर ७० जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही नमुना कोरोना बाधित आढळला नाही. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट शून्य होता. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४,५२,६३१ जणांची चाचणी करण्यात आली. यापैकी २,३२,०१२ जणांची आरटीपीसीआर, तर २,२०,६१९ जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४१,२२० नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून, ४०,५०६ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ७ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
.............
लसीकरणाचा १० लाखांचा टप्पा पूर्ण होणार
कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण हे महत्त्वाचे शस्त्र ठरत आहे. त्यामुळेच प्रतिबंधात्मक लसीकरणावर शासन आणि प्रशासनाकडून भर दिला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९ लाख ९३ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
..............