परिणाम वादळाचा : ४० ते ५० विद्युत खांबांसह ताराही तुटल्यागोंदिया : गोंदिया तालुक्यातील १२ गावांना शनिवारच्या (दि.२१) भयंकर चक्रीवादळाचा फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात वीजेच्या तारा आणि खांब पडल्यामुळे नागरिकांना अंधारात रात्र जागून काढावी लागत आहे. चार दिवसांपासून सहा गावांतील नागरिक अंधारातच आहेत. घराचे छत दुरूस्ती करण्यासाठी बांबू-फाटे गावांत उपलब्ध नाहीत. तहसीलदार व लोकप्रतिनिधींनी गावांत दौरे केले, परंतु ग्रामस्थ मदतीपासून वंचितच आहेत.गोंदिया मुख्यालयापासून केवळ १५ मिकी दूर अंतरावर कोचेवाही, बनाथर, मरारटोला, वडेगाव, शिरपूर, मोगर्रा, परसवाडा, भाद्याटोला व कटंगटोला येथे चक्रीवादळाने कहर केला. या गावांतील घरांचे छत उडाले. छत टिनाचे असो, देशी असो किंवा विदेशी कवेलूंचे असो. ग्रामीण कुटुंबे कशातरी पद्धतीने तापत्या उन्हात राहत आहेत. रात्रीच्या वेळी जाळण्यासाठी केरोसिन उपलब्ध नव्हते, ते आता करून देण्यात आले आहे. अंधारात ग्रामस्थ आपल्या कुटुंबासह कसेबसे रात्र काढून घेतात. या सर्व गावांचा संपर्कसुद्धा खंडित झाला आहे. टेलिफोन लाईन्स उखडल्या आहेत. तसेच गावांतील विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे मोबाईल सेवासुद्धा ठप्प पडली आहे.या गावांतील नागरिकांनी सांगितले की, ज्या शेतकऱ्यांचे धानाचे पुंजने शेतात ठेवले होते, ते पुंजने वादळवाऱ्याने उडून इतरत्र विखुरले आहेत. रबीचे पीक घरी आणूनही ते धान वाचू शकत नाही. घरात ठेवलेली तनसही उडून गेले आहे. अशात पावसाळ्यामध्ये पाळीव जनावरांना चारण्याची समस्या निर्माण झाली आहे. बाधित ग्रामस्थांनी सांगितले की, तहसीलदार दोन दिवसांपूर्वी गावांचा दौरा करून गेले, परंतु गावात रॉकेश, बांबू व फाट्यांच्या आवश्यकतेवर आतापर्यंत कसलीही कारवाई करण्यात आली नाही. या गावातील परिसरात अनेक वृक्ष जळासहीत उखडलेले आढळले. काही वृक्ष अर्ध्यातून तुटलेले आहेत. विजेचे ४० ते ५० खांब क्षतिग्रस्त असल्याचे दिसून आले. आतासुद्धा गावांतील तुटलेले विद्युत तार अपघाताला आमंत्रण देत आहेत. अशा स्थितीत जर मुसळधार पाऊस पडला तर ग्रामीण बाधित कुटुंबे कुठे राहतील? असा सवाल त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी तीन-चार दिवस लागणारसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोचेवाही गावात झालेली हानी जिल्ह्यात प्रथमच झालेली आहे, हे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही मान्य करतात. गोंदिया तालुक्याच्या १०-११ गावांमध्ये विद्युत पुरवठा पूर्णपणे ठप्प आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कंपनीद्वारे युद्धस्तरावर काम केले जात आहे. तरीसुद्धा वीज पुरवठा सुरळीत होण्यास आणखी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.पीक कर्जापासून शेतकरी वंचितएप्रिल महिन्यात वितरित करण्यात येणारे पीक कर्ज कोचेवाही, बनाथर व बडगाव येथील शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाही. या संकटाच्या काळात त्यांची मंजूर रक्कम त्यांना त्वरित देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ४आपदग्रस्त गावांमध्ये कोणते उपाय करण्यात येत आहेत, याबाबत उपविभागीय अधिकारी केएनके राव यांच्याशी विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले की, १६ गावांतील लोकांना रॉकेल उपलब्ध करवून दिले जात आहे. अतिरिक्त कोट्याची व्यवस्था केली जात आहे. लोकांच्या बँक खात्यात पैसा जमा करण्यात आला आहे. काही लोकांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येतील किंवा चेकद्वारे दिले जातील. रेशन दुकानांवर रेशन उपलब्ध करविण्यात आले आहे. सर्व गावांमध्ये लोकांना सेवा पुरवून दिलासा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रॉकेल त्या लोकांनाही उपलब्ध करून दिले जात आहे, ज्यांच्याजवळ गॅस सिलिंडर आहे. प्रशासन पूर्णत: लोकांच्या मतदीसाठी सज्ज झाले आहे. ज्या इमारतींचे काहीशा प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांना भरपाई दिली जाणार आहे.
चार दिवसांपासून सहा गावे अंधारातच
By admin | Published: May 25, 2016 2:02 AM