गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाला उतरती कळा लागली असून हळूहळू सर्वच तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. गोरेगाव, सालेकसा, सडक अर्जुनी आणि देवरी तालुक्यात सध्या एकही रुग्ण नसून हे चारही तालुके ग्रीन झाले आहेत. तीन-दोन तालुक्यांत प्रत्येकी एकच रुग्ण आहे. शुक्रवारी (दि.१२) जिल्ह्यात सहा बाधितांनी कोरोनावर मात केली, तर आठ नवीन रुग्णांची भर पडली.
जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येला ब्रेक लागला असून, कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७७वर आली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ८ नवीन रुग्णांची भर पडली. त्यात सात रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे, तर एक रुग्ण बाहेरील राज्यातील आहे. जिल्ह्यात कोरोना आनुषंगाने आतापर्यंत ६७,५२४ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ५५,६७६ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहे, तर कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी अँटिजेन रॅपिड टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत ६६,८२६ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ६०,६८५ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४,२८१ कोरोनाबाधित आढळले असूृन, यापैकी १४,०२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यापैकी १४,०२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर १९४ स्वॅब नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
......