शेतकरी प्रशिक्षणात कृषी मंडळ अधिकारी सुधीर वरखडे यांनी ५ टक्के निंबोळी अर्क व बीजामृत तयार करण्याची पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे सांगितली. तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे यांनी पर्यावरणपूरक शेतीविषयी माहिती दिली. जैविक व सेंद्रिय खतांचा वापर, जैविक, सेंद्रिय कीटकनाशकाचा वापर, जैविक बुरशीनाशक, जिवाणूनाशक व जिवाणूनाशकाचा वापर, हिरवळी खताच्या वापराबाबत त्यांनी माहिती विशद केली. उमेदचे समन्वयक कोवित रंगारी यांनी दशपर्णी अर्क व जिवामृत तयार करण्याची पद्धत समजावून सांगितले. नोजेंद्र लांडगे यांनी कामगंध सापळे, चिकट सापळे, प्रकाश सापळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दाखवून त्याचे फायदे व महत्त्व पटवून दिले. भुमेश्वरी येरणे यांनी पिकातील मित्र व शत्रू कीड कोणते, ते कसे ओळखायचे, याबाबतची माहिती दिली. सदर शेतकरी प्रशिक्षणात कृषी प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महेश मात्रे, दिनेश भेंडारकर, प्रमोद मेश्राम यांनी परिश्रम घेतले.
माहुरकुडा येेथे कौशल्य आधारीत शेतकरी प्रशिक्षण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 4:26 AM