लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोरेगाव तालुुक्याच्या मुंडीपार येथे २८ डिसेंबरच्या रात्री २३.३० वाजता एमएच ३६ एफ ३२८९ या ट्रकमध्ये २० गाई व २२ गोरे असे ४२ जनावरे डांबून कत्तलखाण्यात वाहतूक करीत असता इंदिरानगर गोरेगाव येथील कदीर खालीफ शेख (३१) यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी कारवाई करून कत्तलखाण्यात जाणाऱ्या जनावरांना चारा-पाणी न देता वाहतूक करीत असता त्या ट्रकला पकडले. सदर घटनेसंदर्भात चार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये ओमप्रकाश अंताराम ढवळे (२६) व पदीम मोबीन शेख, बाबू पटेल तिघेही रा.रामभाऊ वॉर्ड अड्याळ ता.पवनी जि.भंडारा व फरीद साहाब कुरेशी रा.टेकानाका नागपूर या आरोपींविरूध्द प्राण्यांना निदर्यतेने वागविण्याचा कायदा कलम ११ (१) (ड) (ई) सहकलम ७,९ महाराष्ट्र पशूसंवर्धन अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणात ७ लाख ४६ हजार रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.
कत्तलखाण्यात जाणाऱ्या जनावरांचा ट्रक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 10:44 PM
गोरेगाव तालुुक्याच्या मुंडीपार येथे २८ डिसेंबरच्या रात्री २३.३० वाजता एमएच ३६ एफ ३२८९ या ट्रकमध्ये २० गाई व २२ गोरे असे ४२ जनावरे डांबून कत्तलखाण्यात वाहतूक करीत असता इंदिरानगर गोरेगाव येथील कदीर खालीफ शेख (३१) यांच्या तक्रारीवरून.....
ठळक मुद्दे४२ जनावरांची सुटका : गोरेगावच्या मुंडीपार येथे कारवाई