शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

दिव्यांगांची प्रशासन विरोधी नारेबाजी

By admin | Published: February 11, 2017 1:15 AM

दिव्यांगाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी १० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता दरम्यान जिल्हाधिकारी

२०० दिव्यांगांचा आक्रोश : सभा न घेतल्याचा काढला राग गोंदिया : दिव्यांगाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी १० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु दिव्यांगांना बैठक रद्द केल्याची कोणतीही सूचना देण्यात आली नाही. यामुळे बैठकीला आलेल्या २०० दिव्यांगांना बैठक रद्द झाल्याची माहिती मिळताच संतापलेल्या दिव्यांगांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर पडून जिल्हा प्रशासनाच्या विरोधात नारे लावले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आमगाव रस्त्यावर काहीवेळ रस्ता रोको करण्याचा प्रयत्नही केला. आपल्या विविध मागण्यांना घेऊन अपंग कल्याणकारी संघटनेने उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला सोडवितांना त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी १० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अपंगाच्या समस्यांवर तोडगा निघेल या आशेने २०० दिव्यांगांनी बैठकीसाठी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. परंतु त्यांची सभा रद्द झाल्याचे कळताच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील रस्त्यावर येऊन जिल्हाप्रशासनाच्या विरोधात नारे लावले. विशेष म्हणजे प्रशासनाच्या या भुमिकेमुळे संतप्त झालेल्या दिव्यांगांनी आमगाव-गोंदिया रस्त्यावर रस्ता रोको करण्याचा प्रयत्न ही केला. परंतु वेळीच दाखल झालेल्या पोलिसांनी त्यांचा रस्ता रोेको हानून पाडला. पुन्हा सकारात्मक चर्चेकरीता अपंग कल्याण कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. तीव्र आक्रोश व्यक्त करणाऱ्यांमध्ये जिल्हा अपंग कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष दिगंबर बंसोड, दिनेश पटले, शामसुंदर बंसोड, आकाश मेश्राम, चंद्रकला डहारे, सागर बोपचे, राजकुमार भेंडारकर, मिलींद फाये, अर्चना दुणेदार, राखी चुटे, जितेंद्र मस्के व इतरांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)