:लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सिग्नल मिळत नसल्यास अथवा इंजिनमध्ये बिघाड आल्यास रेल्वे गाडी थांबविली जाते. मात्र चक्क गार्डच्या डब्ब्यात साप असल्याने तब्बल तासभर गाडी थांबविण्याची घटना पहिल्यांदाच हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वेस्थानकावर आज (दि.१) रोजी दुपारच्या सुमारस घडली. या प्रकारामुळे रेल्वेस्थानकावर काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.यशवंतपूर-टाटानगर ही गाडी काही तांत्रिक कारणामुळे हावडा-मुंबई मार्गावर वळविण्यात आली. ही गाडी सोमवारी बंगळूर रेल्वे स्थानकावरुन सकाळी ८ : ३० वाजता सुटली.बंगळूर येथील रेल्वेस्थानकावरच या गाडीच्या गार्डच्या डब्ब्यात नाग साप असल्याचे रेल्वे चालक एस.वाय.माहुलकर यांना आढळले. मात्र काही क्षणातच साप पुन्हा दिसेनासा झाला. त्यामुळे त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. आज मंगळवारी ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर पोहचल्यानंतर माहुलकर यांनी पुन्हा गार्डच्या डब्ब्याची पाहणी केली. तेव्हा गार्डच्या डब्ब्यातील कागदांच्या बंडलवर साप दडी मारून बसला असल्याचा आढळला. त्यामुळे तिथे वेळ न घालविता त्यांनी गोंदिया रेल्वेस्थानकावर गाडी थांबवून सापाला डब्ब्यातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. सुरक्षेचा उपाय म्हणून गार्डच्या डब्ब्याला लागून असलेला डब्बा देखील रिकामा केला.गोंदिया रेल्वे स्टेशनचे व्यवस्थापक चौधरी यांना या सर्व प्रकाराची सूचना देऊन सर्प मित्राला बोलावून ठेवण्यास सांगितले. आज दुपारी १ वाजताच्या सुमारास ही गाडी गोंदिया रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांकाजवळील खाली फलाटावर वर पोहचली. त्यानंतर सर्पमित्र बंटी शर्मा आणि रेल्वेच्या कर्मचाºयांनी या गाडीच्या गार्डच्या डब्ब्यात जाऊन पाहणी केली. मात्र त्यांना साप आढळला नाही. तासभराच्या शोध मोहिमेनंतर गाडी रवाना झाली.तासभर डब्ब्याची झाडझडतीसाप असलेल्या गार्डच्या डब्ब्याची सर्पमित्र आणि रेल्वेच्या कर्मचाºयांनी तब्बल तासभर झाडाझडती घेतली. मात्र साप मिळाला नाही. त्यामुळे दुपारी २ वाजताच्या सुमारास ही गाडी गोंदियावरुन टाटानगरकडे रवाना झाली.रेल्वेस्थानकावर गर्दीयशवंतपूर-टाटानगर रेल्वे गाडीच्या डब्ब्यात साप असल्याची माहिती मिळताच गोंदिया रेल्वेस्थानकावर कर्मचाºयांची धावपळ सुरू झाली. ही माहिती रेल्वेस्थानकावरील प्रवाशांना कळताच त्यांनी फलाट क्रमांक ६ कडे धाव घेतली. गाडीजवळ पोहचून साप पाहण्यासाठी गर्दी केली होती.
सापाने थांबविली तासभर ट्रेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 6:10 PM
सिग्नल मिळत नसल्यास अथवा इंजिनमध्ये बिघाड आल्यास रेल्वे गाडी थांबविली जाते. मात्र चक्क गार्डच्या डब्ब्यात साप असल्याने तब्बल तासभर गाडी थांबविण्याची घटना पहिल्यांदाच हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वेस्थानकावर आज (दि.१) रोजी दुपारच्या सुमारस घडली.
ठळक मुद्देयशवंतपूर-टाटानगर गाडीतील प्रकारगार्डच्या डब्ब्यात साप