लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा नक्षलदृष्टया अतिसंवेदनशिल आहे. विकासात अडथळा निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांना विकासाच्या मार्गावर नेणण्यासाठी शासनाने आत्मसमर्पण योजना सुरू केली. या आत्मसमर्पण योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातील १९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. दोन आठवड्यापूर्वी गोंदिया पोलिसांकडे आणखी एका नक्षलवाद्याने आत्मसमर्पण केले आहे. त्याचे नाव ११ मार्चला सायंकाळी ५ वाजता जिल्हाधिकारी जाहीर करणार आहेत.नक्षलवादी मूळ प्रवाहात यावेत त्यांना चांगले जीवन जगता यावे, यासाठी महाराष्टÑ शासनाने आत्मसमर्पण योजना लागू केली आहे. या आत्मसर्पण योजनेंतर्गत गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत १९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. या आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना शासनाकडून बक्षीस व इतर लाभ दिला जातो. मागील दोन आठवड्यापूर्वी गोंदिया जिल्हा पोलिसांसमोर एका जहाल नक्षलवाद्याने आत्मसमर्पण केले. त्याची सर्व सखोल चौकशी केल्यानंतर ११ मार्चला जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात ११ मार्चला पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेत देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १९ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 12:53 AM
जिल्हा नक्षलदृष्टया अतिसंवेदनशिल आहे. विकासात अडथळा निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांना विकासाच्या मार्गावर नेणण्यासाठी शासनाने आत्मसमर्पण योजना सुरू केली. या आत्मसमर्पण योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातील १९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
ठळक मुद्देआणखी एकाचे आत्मसमर्पण: ११ मार्चला जाहीर करणार त्याचे नाव