लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : सामूहिक विवाह सोहळे आज अत्यंत गरजेचे झाले आहे. सामूहिक विवाह सोहळ््यातून पैसा व वेळेची बचत होते. शिवाय सामूहिक विवाह सोहळ््यातून सामाजिक सद्भावना निर्माण होत असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंंत्री राजकुमार बडोले यांनी केले.कोहळी समाजसेवा मंडळाच्यावतीने येथील सरस्वती विद्यालयात आयोजित सामूहिक विवाह सोहळ््यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार हेमकृष्ण कापगते होते. या वेळी व्यासपिठावर आमदार बाळा काशिवार, सेवानिवृत्त न्यायाधीश ज्ञानदेव परशुरामकर, भंडारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वसंत इंचिलवार, सेवानिवृत्त जिल्हा कृषी अधिकारी मनोहर चंद्रीकापुरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स. माजी उपसभापती अॅड. पोमेश्वर रामटेके, कोहळी समाज अध्यक्ष नामदेव कापगते, सचिव मनोहर शहारे, लोकपाल गहाणे, जि.प. सदस्य मंदा कुंभरे, डॉ. गजानन डोंगरवार कुंदा डोंगरवार, नागोजी परशुरामकर, उद्योगपती लुणकरन कुंभरे, कुसन शेंडे, प्रदीप मस्के, शंकर झोडे उपस्थित होते.याप्रसंगी मार्गदर्शन करताना माजी आमदार हेमकृष्ण कापगते यांनी, स्व. शामरावबापू कापगते यांनी १९८१ मध्ये निस्वार्थी भावनेने कोहळी समाज सामूहिक मेळाव्याला सुरुवात केली. सामूहिक विवाह सोहळ््यांमुळे समाजबांधवांच्या पैसा व वेळेची बचत होवून समाजाची उन्नती होते असे मत व्यक्त केले. विशेष म्हणजे, मागील २५ वर्षापासून नियोजित पत्रिकेत दिलेल्या वेळेनुसार लग्न लावण्याची परंपरा समाजाने कायम राखली आहे. शासनाने स्व.शामराव बापू कापगते यांना पद्मश्री किताबाने गौरवान्वित करावे अशी मागणी कोहळी समाज संघटनेने केली. याप्रसंगी अध्यक्ष नामदेव कापगते यांचा सत्कार करण्यात आला. संचालन आशिष कापगते व मोहन कापगते यांनी केले. मेळाव्यासाठी सर्व समाजबांधवांनी सहकार्य केले.११ जोडपी विवाहबद्धकोहळी समाजाच्यावतीने मागील २५ वर्षांपासून अविरत सामूहिक विवाह सोहळ््याचे आयोजन केले जात असून आतापर्यंत शेकडो जोडप्यांचे लग्न सोहळ्यात लावण्यात आले आहे. त्यानुसार, यंदाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात ११ जोडप्यांचे‘शुभमंगल’ लावण्यात आले.
सामूहिक विवाहातून सामाजिक सद्भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 9:06 PM
सामूहिक विवाह सोहळे आज अत्यंत गरजेचे झाले आहे. सामूहिक विवाह सोहळ््यातून पैसा व वेळेची बचत होते. शिवाय सामूहिक विवाह सोहळ््यातून सामाजिक सद्भावना निर्माण होत असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
ठळक मुद्देराजकुमार बडोले : कोहळी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा