अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल मेश्राम होते. पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिगंबर कोरे, उपाध्यक्ष अंजूम आरिफ खान, सदस्य सेगराम पुस्तोडे, राधेश्याम चनाप, लेखराम मुनिश्वर, शोभा महाडोरे, शोभा लांजेवार, वर्षा अंबादे, बाळकृष्ण शहारे, हेमराज मुनिश्वर, शिक्षक एस. सी. फुंडे, डी. पी. डोंगरवार, पी. सी. येळेकर, डब्लू. एम. परशुरामकर, आर. जी. पुस्तोडे, जी. बी. डोंगरवार, सी. एम. भिवगडे, आय. वाय. रहांगडाले, यू. आय. खुटमोडे, एन. आर. गिरेपुंजे उपस्थित होते. सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून इयत्ता दहावीतील गौरव बडोले या विद्यार्थ्याला मुख्याध्यापक मेश्राम यांच्या हस्ते दहावी अभ्यासक्रमाची पुस्तके भेट देण्यात आली. तसेच इयत्ता पाचवीत नवीन प्रवेश घेणारी नेहा नीतेश भोंडेकर या विद्यार्थिनीला संत रोहिदास चरित्र तसेच नमन पटले, सौरव बडोले, दिशा बडोले, शिखा पटले, खुशी बडोले यांना मेश्राम यांच्याकडून थोर पुरुषांचे चरित्र, एक वही व एक पेन भेट देण्यात आले. संचालन एन. आर. गिरेपुंजे यांनी केले. आभार डी. पी. डोंगरवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी सुनंदा मारबते, जी. आर. निंबेकर आणि जे. पी. नंदेश्वर यांनी सहकार्य केले.
जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये सामाजिक न्याय दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 4:19 AM