परसवाडा : रक्तदान शिबिर घेऊन संपूर्ण राज्यातील रक्तपेढीत रक्त जमा करण्याचे कार्य ‘लोकमत’ समूह करीत आहे. रक्तदान हे महान कार्य असून, ‘लोकमत’ समूहाचे हे सामाजिक कार्य मोलाचे आहे, असे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले.
‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत लोकमत समूह, छत्रपती शिवाजी संघ व तिरोडा तालुका पत्रकार संघाच्या वतीने रविवारी (दि. १८) घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चतुर्भुज बिसेन, तिरोडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हुपराज जमईवार, सचिव विजय खोब्रागडे, मुकेश अग्रवाल, लक्ष्मीनारायण दुबे, हितेश जांभुळकर, नितीन आगाशे, डी. आर. गिरीपुंजे, मुरलीदास गोंडाणे, डॉ. श्रद्धांजली रहांगडालेे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पलल्वी भजभुजे, ‘लोकमत’ इव्हेंट विभागाचे श्रीकांत पिल्लेवार, विलास विटनकर, शिवाजी संघाचे अध्यक्ष अनिल वैद्य, आशिष मेश्राम, कीर्ती जमईवार, तीर्थन अंबुले उपस्थित होते.
या शिबिरात १५ युवकांनी रक्तदान केले. त्यांना प्रमाणपत्र, कार्ड व ‘लोकमत’तर्फे बॅग देण्यात आल्या. शिबिरात बीजीडब्ल्यू रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीतील विनोद बन्सोड, आनंद पडोरे, प्रतीक बन्सोड, पल्लवी रामटेके, प्रकाश बारेवार, रमेश माळी यांनी रक्त संकलनासाठी सहकार्य केले. संचालन करून आभार विजय खोब्रागडे यांनी मानले. शिबिरासाठी लोकेश तितीरमारे, विशाल शिवणकर, अतुल तितीरमारे, सुरेंद्र तुंबा, मुगेंद्र बिसेन, सुरेंद्र गोंधुळे, पवन शेंडे, अनिल तुंबा, रूपेश तितीरमारे, परिहार, परी मालाधारी, मुनेंद्र नंदेश्वर, अनिल जांभुळकर यांनी सहकार्य केले.