लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रत्येक समाजबांधवाने समाज कार्यासाठी शासनाच्या निधीवर अवलंबून न राहता समाजाची चळवळ उभारून समाजकार्यासाठी पुढाकार घेऊन सहकार्य करावे, असे प्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.पिंडकेपार येथील जैन कलार समाजभवन लोकार्पण व स्नेह संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेंद्र जैन, विदर्भ को आॅप. बँक नागपूरचे अध्यक्ष रविंद्र दुरुगकर, मध्यवर्ती मंडळाचे माजी सचिव आनंदराव ठवरे, उपाध्यक्ष भूषण दळवे, जि.प.सभापती शैलजा सोनवाने, जि.प. सदस्य दुर्गा तिराले, अ.भा. कलार समाज संघटनेचे अध्यक्ष मुकेश शिवहरे, पं.स. माजी सभापती प्रकाश रहमतकर, समाजाचे माजी अध्यक्ष काशीनाथ सोनवाने, उपाध्यक्ष अशोक इटनकर, समाजाचे अध्यक्ष तेजराम मोरघटे व सचिव सुखराम खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते.सर्वप्रथम माता जैनादेवी व भगवान सहस्त्रबाहू यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन विधीवत पूजन करण्यात आली. या वेळी समाजाचे सचिव सुखराम खोब्रागडे यांनी समाजाच्या वाटचालीबद्दल सविस्तर माहिती दिली व समाजभवन कार्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल मान्यवरांचे व समाज बंधू-भगिनींचे आभार आपल्या प्रास्ताविकातून मानले.यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर निबंध स्पर्धेतील श्रृती सोनवाने, पायल भांडारकर, पल्लवी भांडारकर, प्रियंका लाडे, मेहंदी स्पर्धेत स्नेहा सोनवाने, डॉली तिडके, निना ईटनकर, रांगोळी स्पर्धेत श्रृती सोनवाने, सोनाली मुरकुटे, श्रावणी मोरघडे, एकल नृत्यात प्रियांशी किरणापुरे, रिया अहिरकर, आचल लिचडे, उन्नती हरडे तर सामूहिक नृत्यात मुरकुटे गु्रप, ईटनकर गु्रप व किरनापुरे गु्रप यांना स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.महिला समितीद्वारा आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमात शिला ईटनकर, प्राजक्ता रणदिवे, यशोधरा सोनवाने, मिना सोनवाने, हर्षा आष्टीकर, वर्षा तिडके, ज्योती किरणापुरे, रेखा कावळे, चेतना रामटेक्कर, साधना मुरकुटे, सीमा ईटनकर यांनी सहभाग घेतला.यावेळी उदाराम खोब्रागडे यांच्या स्मृतीत लता खोब्रागडे यांच्या हस्ते समाजाला २५ हजारांचा धनादेश देण्यात आला. संचालन उमेश भांडारकर यांनी केले. आभार पुष्पा भांडारकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी तेजराम मोटघडे, सुखराम खोब्रागडे, शालिकराम लिचडे, सुखराम हरडे, लालचंद भांडारकर, मनोज भांडारकर, नारायण सोनवाने, चंद्रशेखर लिचडे, वरुण खंगार, संजय मुरकुटे, मनोज किरणापुरे, सचिन पालांदूरकर, राजकुमार पेशने, अतुल खोब्रागडे, वशिष्ट खोब्रागडे, मुकेश हलमारे, हेमंत दहिकर, विजय ठवरे, मनिष ठवरे, देवानंद भांडारकर, उमेश हजारे, प्रमोद दहिकर, शिवाजी सोनवाने, शाम लिचडे, दीपक रामटेक्कर, अनिल रामटेक्कर व समाजबांधवांनी सहकार्य केले.मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कारकार्यक्रमात समाजातील वरिष्ठ सदस्य प्रेमलाल रहमतकर, जैनाबाई रहमतकर व भरत हरडे तसेच गुणवंत विद्यार्थी गुंजन भदाडे, अश्विनी ईटनकर, शितल ठवरे, सृष्टी डोंगरे, अनुश्री सोनवाने, योजक मुरकुटे यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच समाजातील उपवर-वधू परिचय पुस्तिकेचे प्रकाशन खासदार पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.
समाजकार्यात समाजबांधवांनी सहकार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 11:54 PM
प्रत्येक समाजबांधवाने समाज कार्यासाठी शासनाच्या निधीवर अवलंबून न राहता समाजाची चळवळ उभारून समाजकार्यासाठी पुढाकार घेऊन सहकार्य करावे, असे प्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : कलार समाजभवनाचे लोकार्पण, समाजातील ज्येष्ठ नागरिक तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार