लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उर्जा सुरक्षेच्या दृष्टीने तसेच शेतकºयांची वीज बिलापासून सुटका व्हावी या उद्देशातून केंद्र शासन शेतकºयांसाठी राबवित असलेल्या ‘सौर कृषी पंप योजने’चा जिल्ह्यात शुभारंभ झाला आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत ७२ शेतकºयांना सौर कृषी पंप देण्यात आले असून त्यांचे काम पूर्ण झाले आहे.महाराष्ट्र हे एक कृषीप्रधान राज्य आहे. नियमीत विद्युत पुरवठा किंवा विद्युत जोडणी नसल्यामुळे शेती उत्पन्नावर अवलंबून असलेल्या शेतकºयांवर, पर्यायाने राज्यावर विपरीत परिणाम होत आहे. शेतकºयांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यासाठी वीज वितरण कंपनीला अनुदान द्यावे लागत आहे. शिवाय औष्णिक पद्धतीच्या वीज निर्मितीमुळे पर्यावरणाचा ºहासही होत आहे. राज्यात बहुतांश वीज निर्मिती औष्णिक पद्धतीने होत आहे. त्यामुळे वायू प्रदूषणात भर पडत असून हवामानावर विपरीत परिणाम होत आहे. करिता केंद्र शासनाने शेतकºयांना कृषीपंपासाठी आता सौर उर्जेचा वापर करण्याचे ठरविले व त्यातूनच ‘सौर कृषी पंप योजना’ पुढे आली.या योजनेतंर्गत जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून जिल्ह्याला १४५ कनेक्शनचे टार्गेट देण्यात आले आहे. एकंदर कृषीपंपांना सौर उर्जेतून वीज पुरवठा झाल्यास शेतकºयांना वीज जोडणीसाठी ताटकळत रहावे लागणार नाही. शिवाय वीज बिलाची थकबाकी असल्यास होणारी पंचाईत व वीज चोरीच्या प्रकारांपासून शेतकºयांची सुटका होणार आहे. तसेच वेळी-अवेळी वीज पुरवठा खंडीत होण्याच्या प्रकारापासून शेतकरी मुक्त होऊन आपल्या शेतीला कधीही पाणी पुरवठा करू शकणार हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे.ज्या शेतकºयांकडे सिंचनासाठी विहीर उपलब्ध आहे, परंतू त्या शेतकºयांना वीज कनेक्शन देणे हे वीज वितरण कंपनीला लागणाºया जास्त खर्चामुळे परवडणारे नाही अशा ५ एकरपेक्षा कमी जमीन क्षेत्र असलेल्या शेतकºयांच्या शेतात ३.५ किंवा ७.५ अश्वशक्ती क्षमतेचे सौर कृषी पंप जिल्ह्यातील ७२ शेतक ºयांच्या शेतात लावून दिले आहे. त्यामुळे या शेतक ºयांना सौर कृषी पंंपाच्या सुविधेमुळे संरक्षीत सिंचनाची व्यवस्था निर्माण होण्यासोबतच उत्पन्न वाढीसाठी देखील मदत झाली आहे.जिल्ह्याला १४५ जोडणींचे टार्गेटसौर कृषिपंप योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १४५ शेतकºयांना सौर कृषी पंपाची जोडणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यापैकी ७२ शेतकºयांना जोडणी देण्यात आली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाचे ३० टक्के, राज्य शासनाचे ५ टक्के वित्तीय अनुदान असून ६० टक्के रक्कम कर्ज स्वरु पात वित्तीय संस्थेमार्फत उपलब्ध करु न देण्यात येत आहे. विशेष म्हणजे, सौर कृषी पंप लावल्यामुळे शेतकºयांची वीज बिलापासून सुटका झाली आहे. पूर्वीच हवालदिल असलेला शेतकरी वीज बिल भरण्यात असमर्थ असल्याने त्यांची जोडणी कापण्याची पाळी आली आहे. अशात सौर कृषी पंप शेतकºयांसाठी वरदान ठरणार आहे.
७२ शेतकºयांना मिळाले सौर कृषी पंप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 11:52 PM
उर्जा सुरक्षेच्या दृष्टीने तसेच शेतकºयांची वीज बिलापासून सुटका व्हावी या उद्देशातून केंद्र शासन शेतकºयांसाठी राबवित असलेल्या ‘सौर कृषी पंप योजने’चा जिल्ह्यात शुभारंभ झाला आहे.
ठळक मुद्देसिंचनासाठी झाली सोय : वीज बिलापासूनही सुटका