लोकमत न्यूज नेटवर्क गोंदियाः गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील भारत बटालियनच्या कँम्पमधील एका जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी घडली. डी.जी.मोरे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या जवानाचे नाव आहे.
आज दिनांक 30 जून रोजी डी जी मोरे यांची पहाटे चार ते सहा पहारा ड्युटी लावण्यात आली होती. ते ड्युटी करत असताना त्यांनी स्वतःच्या हातात असलेल्या बंदुकीने हनुवटीवर गोळी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात जवान रक्तबंबाळ झाल्याने त्यांना उपचारासाठी सहयोग हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे . त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे आयआरबीचे पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी सांगितले.