सडक-अर्जुनी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांचा सत्कार करून शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याबाबत चर्चा करण्यासाठी शिक्षक समितीच्या शिष्टमंडळास वेळ देण्यात यावा अशी मागणी करीत निवेदन देण्यात आले.
निवेदनात, संप कालीन कालावधीतील ३ दिवसांचे वेतन अदा करावे, नक्षलग्रस्त प्रोत्साहन भत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्ता लागू करावा, कोरोनामुळे मरण पावलेल्या शिक्षकांना सुरक्षा कवच अंतर्गत प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीस पाठविणे,
चटोपध्याय व निवड श्रेणी प्रकरण मंजूर करावे, केंद्रप्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरावी, मासिक वेतनातील अनियमितता दूर करून १ तारखेला वेतन मिळण्यासाठी सीएमपी लागू करावे, जीपीएफ हिशोब मार्च २०२१ पर्यंत अद्ययावत करून पावत्या मिळाव्या, एनपीएस, डीसीपीएस, सीपीएफ हिशोब आर-३ मध्ये मिळावा, येथील शिक्षकांच्या ६ व्या वेतन आयोगाच्या ४ व ५ हप्त्याची अपहरित रक्कम मिळावी, आदिवासी क्षेत्रात कार्यरत असेपर्यंत एक स्तराचा लाभ मिळावा, सप्टेंबरच्या वेतन सोबतच सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता मिळावा, सर्व पात्र विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करावी व विज्ञान विषय शिक्षकांसह सर्व विषय शिक्षकांची रिक्त पदे भरावी, सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या शिक्षकांची प्रकरणे ते ज्या दिवशी सेवानिवृत्त होत आहे त्याच दिवशी मंजूर करून सर्व देयक अदा करावे, सेवानिवृत्त शिक्षकांकडून संगणक व अति प्रदान राशी वसूल करू नये, स्थायी, परीक्षा परवानगी, हिंदी-मराठी सूट प्रस्ताव निकाली काढावे, प्रलंबित वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक अवलंब मंजूर करावे आदी मागण्या नमूद आहेत.
निवेदन देताना, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार, संदीप मेश्राम, संदीप तिडके, सतीश दमाहे, टी.एम.शहारे, ओमप्रकाश भूते, महेश कवरे, जीवन म्हशाखेत्री, उमेदलाल हरिणखेडे, जांगळे मोहाडे, राठोड शिष्टमंडळात हे समाविष्ट होते.