लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सर्वसामान्य जनतेला जात वैधता प्रमाणपत्र तयार करण्यासाठी अनेक अडचणी येतात. या अडचणी दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. शनिवारी (दि.१९) डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात जात वैधता प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त देवसुदन धारगावे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी गौतम वाकोडे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना नामदार बडोले यांनी, पुर्वी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र तयार करण्यासाठी नागपूरला जावे लागत असे. परंतू आता प्रत्येक जिल्ह्यात जात वैधता प्रमाणपत्र समिती कार्यान्वीत झाल्यामुळे हा त्रास कमी झाला आहे. राज्यातील वैद्यकीय व अभियांत्रीकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र प्रलंबीत राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत असून येत्या ८ दिवसांत हे काम पूर्ण होणार असल्याचे यावेळी सांगितले. प्रास्ताविक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त देवसुदन धारगावे यांनी मांडले. संचालन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी गौतम वाकोडे यांनी केले. आभार जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके यांनी मानले. कार्यक्र माला विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येत उपस्थित होते.७७७ प्रमाणपत्रांचे वाटपकार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री बडोले यांच्या हस्ते रोशनी भुरे व कल्याणी चिखलोंढे या विद्यार्थिनींना जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अंतर्गत १२ वी विज्ञान -७६८ व्यावसायीक अभ्यासक्रम -५ व निवडणूक विषयक -४ असे एकूण ७७७ जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
प्रमाणपत्राच्या अडचणी दूर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 11:20 PM
सर्वसामान्य जनतेला जात वैधता प्रमाणपत्र तयार करण्यासाठी अनेक अडचणी येतात.
ठळक मुद्देराजकुमार बडोले : जात वैधता प्रमाणपत्र वाटप कार्यक्र म