शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

प्रयोगशाळा कर्मचाºयांच्या समस्या मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:18 PM

गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचाºयांच्या पदावर व वेतनावर शासनाकडून व शैक्षणिक विभागाकडून अन्याय होत आहे.

ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा : विज्ञान विषयाला प्रयोग-प्रात्यक्षिकांची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचाºयांच्या पदावर व वेतनावर शासनाकडून व शैक्षणिक विभागाकडून अन्याय होत आहे. अनेक मुद्यांवर चर्चा करुन पुराव्यानिशी कागदपत्रे दाखल करुनही प्रयोगशाळा कर्मचाºयांच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या नाही. त्यामुळे महाराष्टÑ राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाच्या वतीने येत्या हिवाळी अधिवेशनात मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा कार्याध्यक्ष नरेंद्र भड यांनी दिला आहे.महाराष्टÑ राज्य प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाच्या वतीने संत तुकाराम हायस्कूल गोंदिया येथे रविवारी (दि.१२) घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.अध्यक्षस्थानी राज्य उपाध्यक्ष गोपीचंद कुकडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष अशोक कापगते, गौतम, सचिव सुभाष टेंभुर्णीकर व जिल्ह्यातील प्रयोगशाळा कर्मचारी उपस्थित होते.ते म्हणाले, विज्ञान विषय प्रात्याक्षिकांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. विज्ञान विषयाला प्रयोगशाळा व प्रयोगशाळा कर्मचारी सहाय्यक व परिचर आवश्यक आहे. मात्र कर्मचाºयांची कपात करुन विद्यार्थी व शिक्षकांवर विनाप्रयोगाने विज्ञान विषय शिकवण्याची पाळी आली आहे.सध्या प्रयोगशाळांमध्ये कार्यरत कर्मचाºयांवर मोठा अन्याय केला जात आहे. शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्टÑाच्या शैक्षणिक धोरणानुसार विज्ञानाशिवाय शिक्षण व प्रयोगाशिवाय डॉक्टर, इंजिनियर व शास्त्रज्ञ बनविणार काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.गेल्या अनेक वर्षांपासून प्रयोगशाळा सहाय्यकाची चौथ्या वेतन आयोगापासून ९७५ ऐवजी १२०० रुपये वेतनश्रेणी मंजूर करुन ५ व्या वेतन आयोगात चार हजार ते १० हजार ही वेतन श्रेणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देणे गरजेचे होते. तसेच आश्वासीत प्रगती योजनेत कर्मचाºयांना कुठलाही लाभ न देता कर्मचाºयांवर उघड अन्याय केला जात आहे.यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी व कर्मचाºयांवरील अन्याय दूर करण्यासाठी महाराष्टÑ प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष भरत जगताप यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी लाक्षणिक उपोषण करुन, मागण्या मान्य न केल्यास हिवाळी अधिवेशनावर मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती जिल्हा कार्याध्यक्ष भड यांनी दिली.