शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

हजेरीपटाची तांत्रिक अडचण सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 4:27 AM

बाराभाटी : गेल्या काही दिवसांपासून अर्जुनी- मोरगाव तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यात आली आहेत. यात मजुरांची ...

बाराभाटी : गेल्या काही दिवसांपासून अर्जुनी- मोरगाव तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यात आली आहेत. यात मजुरांची हजेरी ऑनलाइन झाली असून, यामध्ये मागणी केलेल्या सर्व मजुरांची हजेरीपटावर नावेच येत नसल्याचा प्रकार अनेक दिवसांपासून सुरूच आहे. ही तांत्रिक अडचण लवकरात लवकर सोडवा, अशी मागणी रोजगार हमी योजनेतील कामावर असलेल्या मजुरांनी केली आहे.

रोजगार हमी योजना कामांचा कारभार तहसील कार्यालय व पंचायत समितीतून हाताळला जातो. आता रोजगार हमी योजनेतील कामावर रोजगार सेवकांकडून मागणी केली जाते व मजुरांचे नावही ऑनलाइन हजेरीपटावर नोंदवून त्यांची मजुरी काढली जाते. मात्र या ऑनलाइन हजेरीपटातून अनेक मजुरांची नावेच सुटत असल्याचा प्रकार घडत आहे. या प्रकरणाची माहिती घेऊन चौकशी केली असता काम करणारे कर्मचारी तांत्रिक अडचण आहे असे सांगतात. संबंधित कर्मचारी हे संबंधित तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेला पाठवितात. पण त्यावर काही मार्ग सापडत नसल्याचे लक्षात येते, ही अतिशय गंभीर समस्या आहे. ज्या मजुरांचे नाव ऑनलाइन हजेरीपटावर येत नाही त्याला आठवडाभर काम मिळत नसून आठवडाभराची मजुरीही मिळत नाही. असा प्रकार तांत्रिक अडचणींमुळे सुरू आहे. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी या प्रकरणात लक्ष घालून ही अडचण मार्गी लावण्याची मागणी केली जात आहे.

----------------

ही फार गंभीर समस्या आहे, मी जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांशी बोलतो. ज्या मजुरांचे नाव आले नाही त्यांनी नमुना-४ भरून क्लेम करावा म्हणजे बेकारी भत्ता अशा मजुरांना मिळेल.

- मनोहर चंद्रिकापूरे,

आमदार तथा अध्यक्ष, रोजगार हमी योजना समिती

-------------

आमचे नाव नाही तर बेकारीभत्ता द्या

ज्या मजुरांची ऑनलाइन हजेरीपटावर नावे येत नाही त्यांचे नमुना-४ भरून क्लेम करुन बेकारीभत्ता मिळचो. त्यासाठी रोजगार सेवकांकडून प्रकरण तयार करून संबंधित कार्यालयात दाखल करता येते.