शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

कुणाला दिसले का ‘अच्छे दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 9:37 PM

महागाईने देश होरपळून निघत आहे. दररोज पेट्रोल, डिझेलचे भाव वाढत आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत दिवसेंदिवस घटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘अच्छे दिन’ आणू शकले नाहीत. राज्यात लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणूका घेतल्यास आपली तयारी असायला पाहिजे असे मत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल यांचा सवाल : पेट्रोल, डिझेल वाढीवर व्यक्त केला संताप

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : महागाईने देश होरपळून निघत आहे. दररोज पेट्रोल, डिझेलचे भाव वाढत आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत दिवसेंदिवस घटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘अच्छे दिन’ आणू शकले नाहीत. राज्यात लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणूका घेतल्यास आपली तयारी असायला पाहिजे असे मत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केले.तिरोडा येथील काँग्रेस भवनात आयोजित विशेष सभेत ते बोलत होते. तिरोडा विधानसभा क्षेत्रातील सर्व बूथ समन्वयक, काँग्रेस पदाधिकारी, महिला काँग्रेस, पं.स. जि.प. सदस्य, सरपंच, उपसरपंच सदस्य तसेच विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांची सभा आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष बबनराव तायवाडे, सचिव उमाकांत अग्नीहोत्री, डॉ. योगेंद्र भगत, विनोद जैन, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, बुथ समन्वयक पी.जी.कटरे, तालुका अध्यक्ष राधेलाल पटले, शहर अध्यक्ष लक्ष्मीनारायण दुबे, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष शिशुपाल पटले, आलोक मोहंती, डेमेंद्र रहांगडाले, महिला आघाडी अध्यक्ष पौर्णिमा रहांगडाले, शहर अध्यक्ष रुबीना मोतीवाला, कैलास पटले उपस्थित होते.महागाई डायन खाय जात है, या स्मृती ईरानी यांच्या वाक्याचा उमाकांत अग्नीहोत्री यांनी चांगलाच समाचार घेतला. सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष शिशुपाल पटले यांनी भाजपा सरकार खोटे आश्वासने देत असून सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे. काळा धन परत आला नाही. कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा झाले नाहीत. शेतकºयांचे कर्जमाफीची योजना फसवी ठरली आहे. कर्ज मिळणार कर्ज माफ झाले असे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात कित्येकांना याचा फटका बसला आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे असे सांगितले. उपस्थित मान्यवरांनी पक्ष संघटन व बूथ कमेटी यावर मार्गदर्शन करुन मोदी सरकारच्या धोरणावर टिका केली.प्रास्ताविक लक्ष्मीनारायण दुबे, संचालन मानिक झंझाड तर आभार ओमप्रकाश पटले यांनी मानले. या कार्यक्रमाचे नियोजन तालुकाध्यक्ष राधेलाल पटले यांनी केले. यशस्वितेसाठी सरीता अंबुले, पंचशिला रामटेके, जितेंद्र कटरे, शोभेलाल दहिकर, भुपेंद्रसिंग बैस, डॉ. गिरधर बिसेन, दिलीप असाटी, हुपराज जमईवार, महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलचे गोंदिया जिल्हाध्यक्ष डी.आर. गिरीपुंजे, प्रा. विलास मेश्राम, हितेंद्र जांभूळकर, धमेंद्रसिंग चव्हाण, प्रेमलाल पटले, डॉ. ढाले, लेखराज हिरापुरे, विरेंद्र शेंडे, अशोक पारधी, बाबूलाल ठाकरे, संतोष निनावे यांनी सहकार्य केले.