केंद्रीय अर्थसंकल्प : राजकीय, सामाजिक क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रियागोंदिया : केंद्र सरकारने सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे अनेक स्तरातून स्वागत झाले. मात्र या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस उपाययोजना नसून त्यांच्यावर भुर्दंड पडणार असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.सर्वसामान्यांसाठी निराशाजनकहा अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारा नाही. करपात्र उत्पन्न मर्यादा वाढविली नसल्यामुळे सर्वांच्या खिशाला कात्री लागणार आहे. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने ठोस पाऊल उचलल्याचे दिसून येत नाही. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न सध्याच्या उत्पन्नापेक्षा दुप्पट करणार असे पंतप्रधान मोदी म्हणाले. सर्व्हेक्षण अहवालानुसार शेतकऱ्यांचे सध्याचे वार्षिक उत्पन्न केवळ २२ हजार रुपये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न जर पुढील ६ वर्षात ४४ हजार होणार असेल तर ही स्थिती काही चांगली असेल असे म्हणता येणार नाही.- राजेंद्र जैन, विधान परिषद सदस्य, गोंदिया-भंडाराशेतकऱ्यांचा विचार व्हायला हवा होताशेतकऱ्यांसाठी क्रॉप इन्शुरन्स स्कीम अतिउत्तम आहे. परंतु त्याचबरोबर विदर्भातील शेतकऱ्यांसाठी पाण्याची सोय, रासायनिक खते आणि औषधे यांच्यासाठी एमआरपीचा कायदा बदलणे गरजेचे होते. शेतमालाच्या मार्केटींगची पण विशेष व्यवस्था करायला हवी. शेतकऱ्याला परवडेल असे बाजारभाव निश्चित केल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. पाणी, जमीन आणि त्याचबरोबर शेणखत, रासायनिक खत सोडून अन्य बाबतीत जर लक्ष घातल्या गेले तर पाच वर्षात विदर्भातल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल. त्यादृष्टीने सरकारने विचार करणे अपेक्षित आहे.-महादेवराव शिवणकरमाजी अर्थमंत्री, महाराष्ट्र शासनशेतकऱ्यांसाठी निराशाजनक अर्थसंकल्पकेंद्र सरकारने आधिच शेतकऱ्यांची मोठी नाराजी ओढवून घेतली आहे. आता या अर्थसंकल्पात तरी त्यांना दिलासा मिळेल असा काही निर्णय घेतला जाईल असे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. - गंगाधर परशुरामकरगटनेता, राष्ट्रवादी काँग्रेस, जि.प.गोंदियाअर्थसंकल्प घालणार महागाईत भरकेंद्र सरकारने सामान्य माणसांना दिलासा देण्याऐवजी करात वाढ केली. हवाई आणि रेल्वे वाहतूक महाग झाली. केबल टिव्ही, फ्रिज महाग झाले. सर्वसामान्यांसाठी संपर्काचे माध्यम असणारे मोबाईल महाग होणार. एकूणच महागाईत भर घालणाला अर्थसंकल्प आहे.- प्रा.डॉ.माधुरी नासरेअध्यक्ष, महिला अर्बन बँकअर्थसंकल्पाने केली सर्वसामान्यांची निराशासामान्य नागरिकांना आधीच अच्छे दिन येण्याचे स्वप्न दाखवत निराश करण्यात आले. आता पुढेही दिलासा मिळण्याऐवजी आणखी निराश व्हावे लागणार याचे संकेत या अर्थसंकल्पाने दिल्याचे दिसून येत आहे.- सहेसराम कोरोटेमहामंत्री, जिल्हा काँग्रेस कमिटीग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार गतीग्रामीण भागातील रस्ते, रोजगार हमीची कामे यासाठी सरकारने मोठा निधी दिला आहे. घर बांधकामावरील कर हटविला. मात्र आयकराची मर्यादा वाढविणे गरजेचे होते.- अविनाश ठाकूरविकास अधिकारी, एलआयसी
थोडी खुशी, थोडा गम..
By admin | Published: March 01, 2016 1:09 AM