लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोकणा (जमीदारी) येथील आरोपी मुकुंदा अंताराम सतीमेश्राम (३०) हा आपल्या पत्नीवर चरित्र्याचा संशय घेत होता. परंतु सुनेच्या मध्यस्तीसाठी येणाऱ्या आईलाच त्या कुपुत्राने वरवंटा घालून ठार केले. या कुपुत्राला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सोमवारी (दि.२) सुनावली आहे. मृत मातेचे नाव सेवंता सतीमेश्राम असे आहे.डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कोकणा जमी येथील आरोपी मुकुंदा सतीमेश्राम हा आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घ्यायचा. याच कारणावरुन १२ जुन २०१६ रोजी रात्री ८ वाजता मुकुंदाने आपल्या पत्नीशी वाद घातला. या वादात मुकुंदाची आई सेवंता सतीमेश्राम ही मध्यस्ती करण्यासाठी आली. तिने सुनेची बाजू घेत मुलाला दोष दिला. त्यावर मुकुंदाने आपल्या आईलाच शिवीगाळ केली. काही वेळानंतर वाद संपला व सगळे जेवण करुन झोपले.१३ जुन २०१६ रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास पुन्हा मुकुंदाने आपल्या पत्नीशी वाद सुरु केला. त्याने पत्नीला मारायला वरवंटा घेतला व तिच्या दिशेने धावला. मात्र भांडण सोडविण्यासाठी सेवंता सतीमेश्राम या मधात आल्याने मुकुंदाने रागाच्या भरात आपल्या आईच्या डोक्यावर वरवंट्याने पाच-सहा मारून त्यांना जागीच ठार केले. या घटनेसंदर्भात डुग्गीपार पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी केला होता. या प्रकरणाची सुनावनी सोमवारी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश कमलाकर कोठेकर यांनी केली. या प्रकरणातील आरोपी मुकुंदाला जन्मठेपेची शिक्षा व २ हजार रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून महेश चांदवानी यांनी काम पाहिले. या प्रकरणात ७ साक्षदार तपासण्यात आले. न्यायालयीन कामकाजासाठी सहायक फौजदार राजकुमार कराडे यांनी काम पाहिले.
जन्मदात्रीचा खून करणाऱ्या पुत्रास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 10:38 PM
सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोकणा (जमीदारी) येथील आरोपी मुकुंदा अंताराम सतीमेश्राम (३०) हा आपल्या पत्नीवर चरित्र्याचा संशय घेत होता. परंतु सुनेच्या मध्यस्तीसाठी येणाऱ्या आईलाच त्या कुपुत्राने वरवंटा घालून ठार केले.
ठळक मुद्देजिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल : पत्नीच्या चरित्र्यावर घेत होता संशय