साखरीटोला-ठाणा मार्गाने गोंदियाला ये-जा करणे सोयीचे आहे. या मार्गाने बरेच लोक अपडाउन करतात. कवडी, वडद, सोनेखारी, पिपरटोला, आसोली, तिगाव ही गावेही याच मार्गावर वसली आहे. अनेक लोक शार्टकट म्हणून या मार्गाने ये-जा करणे पसंत करतात, परंतु वाहनधारकांना काही ठिकाणी खड्डे पडल्याने, तसेच गिट्टी उखडल्याने तारेवरची कसरत करावी लागते. कवडी ते वडद, सोनेखारी ते पिपरटोला या गावाजवळील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खाचखळग्याने वाहने स्लीप होतात. सोनेखारी ते पिपरटोला या गावाच्या मध्यंतरी असलेला लहान नाल्यावरील पूल तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण होते. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी लक्ष देत नाहीत. रस्त्याची दुरुस्ती करून तुटण्याच्या मार्गावर असलेल्या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी तिगाव येथील मनसेचे शाखा अध्यक्ष कुणाल शेंडे यांनी केली आहे.
सोनेखारी-पिपरटोला रस्ता उखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2021 4:10 AM