शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

पूर्व गोंदियासाठी विशेष विद्युत लाईन

By admin | Published: April 13, 2016 2:02 AM

उन्हाच्या तिव्रतेसोबतच विजेचा लपंडावही वाढत चालला आहे. ऐन उन्हाळ््यात विजेच्या या खेळीमुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत.

१५ दिवस चालेल काम : भर उन्हाळ्यात सिव्हील लाईनमध्ये विजेचा लपंडावकपिल केकत गोंदियाउन्हाच्या तिव्रतेसोबतच विजेचा लपंडावही वाढत चालला आहे. ऐन उन्हाळ््यात विजेच्या या खेळीमुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत. यातच शहरातील सिव्हील लाईन्स परिसरात आजघडीला जास्त प्रमाणात विजेचा लपंडाव सुरू आहे. पूर्व गोंदियाकडील भागासाठी वीज कंपनीकडून विशेष लाईन टाकली जात असून हे काम पूर्ण होईपर्यंत, म्हणजेच एप्रिल अखेरपर्यंत नागरिकांना विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागणार आहे.वर्षभरात इतर ऋतूत वीज पुरवठा खंडीत झाल्यास तेवढा त्रास होत नाही. मात्र उन्हाळ््यात वीज गेली तर अगोदर वीज वितरण कंपनीच्या नावाने लोक बोटे मोडू लागतात. उन्हाळ््यात विजेची मागणी व वापर वाढत असल्यानेही याच दिवसांत जास्त प्रमाणात बिघाड येतात. वितरण व्यवस्थेत आलेल्या बिघाडाचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. आजघडीला जिल्हा भारनियमनमुक्त असला तरी वेळीअवेळी वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सुरू च आहेत. त्यामुळे हे कोणते भारनियमन? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. यातही शहरातील सिव्हील लाईन्स परिसरात हे प्रकार जास्त प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना जास्त त्रास सहन करावा लागत आहे. पूर्व गोंदियातील काका चौक, गोविंदपूर, छोटा गोंदिया, जनता कॉलनी, शास्त्री वॉर्ड, पंचायत समिती कॉलनी आदि भागांना सध्या रावणवाडी व गोरेगाव लाईनवरून वीज पुरवठा केला जात आहे. अशात या दोन लाईनवर कुठेहीेकाही नादुरूस्ती झाल्यास शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील वीज पुरवठा खंडीत होत आहे. या भागात वर्ग एक दर्जाच्या अधिकाऱ्यांसह अनेक प्रतिष्ठितांची घरे आहेत. विशेष म्हणजे, या भागासाठी विशेष लाईन टाकण्याचे काम सुरू असून लवकरच हे काम पूर्ण झाल्यास वीजेच्या या समस्येपासून या भागाची सुटका होणार आहे. उर्वरीत शहराला दोन विशेष लाईनवरून पुरवठा केला जात असल्याने उर्वरीत शहरात वीज पुरवठा खंडीत होण्याची समस्या कमी आहे. एप्रिल महिना मेंटेनन्सचावीज वितरण कंपनीत एप्रिल महिना हा देखभाल-दुरूस्तीचा (मेंटनन्सचा) असतो. याला ‘प्री मान्सून मेंटनन्स’ म्हटले जाते. या काळात वीज विभागाकडून झाड कापणे, रोहीत्राची देखभाल-दुरूस्ती, लघूदाब व उच्चदाव लाईन देखभाल-दुरूस्ती केली जाते. त्यानुसार आताही जिल्ह्यात ही सर्व कामे सुरू आहेत. कधी ही कामे वीज पुरवठा सुरू असताना करावी लागतात. कधी ही कामे वीज पुरवठा बंद करून करावी लागतात. विशेष म्हणजे दुरूस्तीच्या कामांत थोडीही चूक झाल्यास त्याची शिक्षा जीवावरच बेतते. त्यामुळे वीज पुरवठा बंद करूनच ही कामे करणे जास्त सुरक्षित असते. या शिवाय वीजेचा दाब वाढल्यानेही वितरण व्यवस्थेत नादुरूस्ती येत असून त्यामुळेही वीज पुरवठा खंडीत होत असतो.असा होतो वीज पुरवठाजवळील एमआयडीसी येथे १३२ केव्ही उपकेंद्रातून चार वाहिन्या निघाल्या आहेत. यात एक कारंजा मार्गे गोरेगावसाठी, दुसरी रावणवाडीसाठी तर उर्वरीत दोन वाहिन्यांतून सुर्याटोला उपकेंद्राच्या माध्यमातून शहराला वीज पुरवठा केला जातो. यात सिव्हील लाईन्स परिसरातील गोविंदपूर, छोटा गोंदिया, जनता कॉलनी, शास्त्री वॉर्ड, पंचायत समिती कॉलनी आदि भागांसाठी विशेष व्यवस्था नसल्याने सध्या या भागासाठी एमआयडीसीवरून विशेष लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. ही लाईन एमआयडीसीवरून निघणार असून कुडवा नाका, बालाघाट रोड टी-पॉईंट, हड्डीटोली रेल्वे चौकी मार्गे भीमघाट उपकेंद्राला जोडली जाणार आहे. या लाईनचे काम येत्या ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार असल्याचा अंदाज आहे. त्यानंतर सिव्हील लाईन्स परिसरात या भागातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होण्याची समस्या संपणार आहे. मात्र तोपर्यंत या परिसराला गोरेगाव व रावणवाडी फिडरवरून पुरवठा केला जात आहे.