शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
2
गजकेसरी, लक्ष्मी नारायण राजयोगात अक्षय्य तृतीया: ८ राशींना अक्षय्य लाभ, यश-प्रगती; शुभ घडेल!
3
बीडमध्ये महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण! काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- "पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर..."
4
जन्मताच पैसे कमवायला सुरुवात! वर्षात ११ कोटींची कमाई; १७ महिन्यांचे बाळ २१४ कोटींचे मालक
5
आता या सगळ्यांना पोहोचवण्याची वेळ आलेली आहे! मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर भडकले आदेश बांदेकर
6
मराठी अभिनेत्रीने सांगितला विराट कोहलीसोबत शूटिंगचा अनुभव, म्हणाल्या, "माझ्या मुलीसाठी त्याने..."
7
केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लेकीचं झालं बारसं! नाव काय ठेवलं माहितीये? शब्दाला आहे खास अर्थ
8
सोन्याच्या किमतीचा नवा विक्रम! १० ग्रॅमसाठी तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या
9
"क्रिकेटपटूंनी विवस्त्र फोटो पाठवले, शिविगाळ केली, एकाने तर…’’, मुलगी बनलेल्या अनाया बांगरचे सनसनाटी आरोप 
10
सासू जावयानंतर आता बिर्याणीवाला...; कामावर ठेवलेला पोरगाच मालकाच्या पत्नीला पळवून घेऊन गेला
11
बदल्याची आग! उपचाराच्या बिलामुळे झाला कर्जबाजारी, रुग्णालयात चोरी करणारा हायटेक चोर
12
एसबीआयमध्ये १००००० रुपयांवर मिळतंय २४,६०४ चे निश्चित व्याज; एफडीचा कालवधी किती?
13
मोठी बातमी: अपघातग्रस्त रुग्णांवर १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार करा; बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
14
"मुख्यमंत्री महोदय, हे फोटो पाहूनही तुम्हाला झोप कशी लागते?"; रोहिणी खडसे यांचा संताप
15
Video - संतापजनक! सर्दीच्या उपचारासाठी आलेल्या मुलाला डॉक्टरने दिलं सिगारेट ओढण्याचं ट्रेनिंग
16
वरमाला पडली अन् नवरदेवाने दिलेले दागिनेच खोटे निघाले; मग काय नवरीने...
17
मुंबई: शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले अन् तरुणाने स्वतःच्या गळ्यावर झाडली गोळी, किती लाख बुडाले?
18
पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!
19
बुलढाणा: केसगळतीनंतर आता ‘नखगळती’; ४६ जण बाधित; शेगाव तालुक्यातील ५ गावांत लक्षणे
20
शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्रालयातील अधिकारी? गुन्हे दाखल करण्याची मागणी

कुंभमेळ्यासाठी गोंदिया, इतवारी येथून विशेष रेल्वे गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 16:42 IST

भाविकांची होणार सुविधा : चार दिवस सोडणार गाड्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रयागराज महाकुंभमेळात जाण्यासाठी भाविकांचा वाढलेला ओढा बघता भाविकांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने गोंदिया आणि इतवारी जंक्शनवरून काही ठराविक दिवशी विशेष गाडी कुंभमेळाकरिता चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने १८, २०, २१ व २३ फेब्रुवारी या चार दिवशी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. यात गाडी क्र. ०८८६७गोंदिया-तुंडला कुंभमेळा विशेष ट्रेन १८ फेब्रुवारी रोजी गोंदिया येथून सोडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विरुद्ध दिशेला सुद्धा ०८८६८ तुंडला-गोंदिया कुंभमेळा विशेष ट्रेन तुंडला येथून १९ फेब्रुवारी रोजी चालविण्यात येत आहे.

द.पू.मध्य रेल्वेकडून धावणाऱ्या कुंभमेळा विशेष ट्रेनला डोंगरगड, राजनांदगाव, दुर्ग, रायपूर, भाटपारा, उसलापूर, पेंड्रारोड, अनुपपूर, शहडोल, उमरिया, न्यू कटनी जंक्शन, कटनी, मैय्यर, सतना जंक्शन, माणिकपूर जंक्शन, प्रयागराज, फतेहविंदपूर, टी. जंक्शन, टी. सदर ही गाडी गोंदियाहून सकाळी ८:२० वाजता सुटेल आणि डोंगरगड, राजनांदगाव, दुर्ग, रायपूर मार्गे दुसऱ्या दिवशी सकाळी ९:३० वाजता टुंडला येथे पोहोचेल. तीच गाडी टुंडला येथून सकाळी ११:३० वाजता सुटेल आणि इटावा, गोविंदपुरी, फतेहपूर, प्रयागराज, माणिकपूर मार्गे १५:२० वाजता गोंदियाला पोहोचेल.

त्याचप्रमाणे गाडी क्रमांक ०८८६३ इतवारी-तुंडला ही २० फेब्रुवारीला आणि ट्रेन क्रमांक तुंडला-इतवारी २१ फेब्रुवारीला चालेल. या गाडीचा थांबा भंडारा रोड, तुमसर, गोंदिया, बालाघाट, नैनपूर, मदनमहल, कटनी, मैहर, सतना जंक्शन, माणिकपूर जंक्शन, प्रयागराज, फतेहपूर, गोविंदपुरी, इटावा रेल्वे स्थानकांवर असेल. तर, २३ फेब्रुवारी रोजी गोंदिया येथून गाडी क्रमांक ०८८६८ गोंदिया-तुंडला कुंभमेळा विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विरुद्ध दिशेला सुद्धा ०८८७० तुंडला गोंदिया कुंभमेळा विशेष गाडी तुंडला येथून २४ फेब्रुवारी रोजी चालविण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे वाणिज्य व्यवस्थापक यांनी दिली आहे. प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्यांची गर्दी वाढली असून चार विशेष गाड्यांमुळे आता भाविकांना सुविधा होणार आहे.

प्रवाशांची गर्दी लक्षात घेता निर्णयमहाकुंभमेळ्या दरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. वाढती गर्दी आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने चार दिवस विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया