कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील कचरा संकलानासाठी नगर परिषदेने ३३ ऑटो टिप्पर खरेदी केले.आता विशेष हातगाड्यांचीही खरेदी करण्यात आली आहे. १२२ गाड्यांची खरेदी केली जाणार असताना सध्या १० गाड्या आल्या आहेत यात तीन कप्पे आहेत. त्यात ओला-सुका व इनर्ट कचरा टाकायचा आहे. नगर परिषदेचे स्वच्छ गोंदियाच्या दिशेने केले जात असलेले हे प्रयोग वाखाणण्याजोगे आहे. घंटागाडी नियमित चालविली जात नसताना आता या हातगाड्यांसाठी मनुष्यबळाची नियुक्ती करावी लागणार आहेत. ही सर्व प्रक्रिया होईपर्यंत या गाड्याही ऑटो टिप्पर सारख्याच धूळखात पडून राहण्याची शक्यता आहे.गोंदिया शहर स्वच्छ ठेवण्यासाठी शासनाकडून नगर परिषदेला ऑटो टिप्पर व हातगाड्या खरेदी करण्याची परवानगी आणि निधी देण्यात आला. यातून नगर परिषदेने ३३ ऑटो टिप्पर खरेदी केले आहेत. मात्र हे ऑटो टिप्पर चालविण्यासाठी चालक व हेल्पर लागणार असल्याने नगर परिषदेने निविदा टाकली. आता याला महिनाभरापेक्षा जास्त कालावधी लोटला असताना निविदा उघडण्यासाठी नगर परिषदेला मुहूर्त सापडला नाही. परिणामी हे ऑटो टिप्पर धूळ व पाणी खात नगर परिषद कार्यालयाच्या परिसरात शोभा वाढवित आहेत. त्यात आता नगर परिषदेने कचरा वर्गीकृत करून संकलीत करण्यासाठी विशेष हातगाड्या खरेदी केल्या आहेत. नगर परिषद अशा १२२ गाड्या खरेदी करणार असतानाच सध्या फक्त १० गाड्या नगर परिषदेच्या हाती आल्या आहेत.या गाड्यांत ओला-सुका-इनर्ट कचरा असे तीन कप्पे तयार करण्यात आले आहेत. यातील इनर्ट कचरा म्हणजे, जो कचरा आरोग्यासाठी सुरक्षीत नाही (सॅनिटरी पॅड,औषधांचे प्रकारे इत्यादी) त्याचा समावेश राहणार आहे. याशिवाय, या गाड्या शहरातील रस्त्यांवर पडलेला कचरा व माती उचलणार आहे. यामुळे शहरातील वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीची समस्या सुटणार आहे.शहरात सध्या सुरू असलेल्या घंटागाड्या चालविण्यासाठी नगर परिषदेकडे फक्त २० मजूर असल्याची माहिती आहे. परिणामी घंटागाडी नियमित सुरू नसल्याची शहरवासीयांची ओरड आहे. त्यात आता एक-दोन नव्हे तर १२२ हातगाड्या ओढणे म्हणजेच डोंगरावर चढण्याचा प्रकारच दिसून येत आहे. हातगाड्यांसाठी मनुष्यबळ नसताना हा नवा प्रयोग नगर परिषद अंमलात आणणार आहे. म्हणजेच आता हातगाड्यांसाठी एजंसीमार्फत माणस घेतली जातील यात शंका नाही.एकीकडे ऑटो टिप्परसाठीची निविदा उघडून ते कामात आणण्यासाठी नगर परिषदेला मुहूर्त मिळाला नाही. त्याता आता हातगाड्यांचा प्रयोग राबविण्यात नगर परिषदेला आणखी किती महिने लागतात हे बघायचे आहे. मात्र तोवर या हातगाड्याही नगर परिषदेच्या आवारात धूळखात पडून राहतील यात शंका नाही.ऑटो टिप्परची निविदा पेंडींंगऑटो टिप्पर पडून असल्याचा विषय ‘लोकमत’ने हाती घेतल्यानंतर नगर परिषदेने दुसºयाच दिवशी निविदा उघडू असे सांगत आपली बाजू सांभाळून घेतली. त्यानुसार, बुधवारी (दि.१८) स्वच्छता विभागाकडून ऑटो टिप्परसाठी चालक हेल्परची निविदा उघडण्यात आली. मात्र काही निविदा उघडण्यात आल्यानंतर वीज पुरवठा खंडीत झाल्याने हे काम मधातच फसले.त्यामुळे आता शुक्रवारी निविदा उघडण्याचे ऐकिवात आहे. आता खरच निविदा उघडल्या जातात की यात मांजर आडवी जाते हे कळेलच.
कचरा संकलनासाठी आल्या विशेष हातगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 6:00 AM
या गाड्यांत ओला-सुका-इनर्ट कचरा असे तीन कप्पे तयार करण्यात आले आहेत. यातील इनर्ट कचरा म्हणजे, जो कचरा आरोग्यासाठी सुरक्षीत नाही (सॅनिटरी पॅड,औषधांचे प्रकारे इत्यादी) त्याचा समावेश राहणार आहे. याशिवाय, या गाड्या शहरातील रस्त्यांवर पडलेला कचरा व माती उचलणार आहे. यामुळे शहरातील वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीची समस्या सुटणार आहे.
ठळक मुद्देतीन कप्प्यांची सुविधा : १२२ गाड्यांची खरेदी होणार, मनुष्यबळाचा मात्र अभाव