लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : इंझोरी-बोंडगावदेवी उत्तर वाहिनी त्रिवेणी संगम या तिर्थक्षेत्राचा विकास व्हावा. या ठिकाणी ये-जा करताना भाविकांना त्रास होवू नये म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नाला सरळीकरण कामाला सुरूवात करण्यात आली. वेगवेगळ्या तीन दिशेने येणारे नाले एकत्रीकरणाने सरळ व्हावे यासाठी कामाला गती दिली जात आहे.इंझोरी गावापासून दीड किमी अंतरावर असलेल्या उत्तर वाहिनी तीर्थक्षेत्र स्थळी विधिवत पूजा-अर्चा सभापती शिवणकर यांच्या हस्ते करुन नाला सरळीकरण कामाला सुरूवात झाली.याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा भाजपाचे जिल्हा महासचिव लायकराम भेंडारकर, सरपंच शेवंता गुढेवार, उपसरपंच दीपिका रहिले, खंड विकास अधिकारी नारायण जमईवार, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र खोटेले, सदस्या नलू शेंडे, देवयानी मेश्राम, पोलीस पाटील मेंढे, नरेंद्र गोमासे प्रामुख्याने उपस्थित होते. नाला सरळीकरण कामावर ४ लाख ८२ हजार २७४ रुपये खर्च होणार असून पहिल्याच दिवशी १७५ मजुरांनी हजेरी लावली.संचालन करून आभार ग्रामसेवक नरेंद्र गोमासे यांनी मानले.
उत्तर वाहिनी त्रिवेणी संगमच्या विकास कामाला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 9:11 PM
इंझोरी-बोंडगावदेवी उत्तर वाहिनी त्रिवेणी संगम या तिर्थक्षेत्राचा विकास व्हावा. या ठिकाणी ये-जा करताना भाविकांना त्रास होवू नये म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नाला सरळीकरण कामाला सुरूवात करण्यात आली.
ठळक मुद्देनाला सरळीकरणाचे काम सुरू : १७५ मजुरांची कामावर हजेरी