लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील सुर्याटोला परिसरातील तलावाच्या सौंदर्यीकरणाचा ८९ लाख ६९ हजार ५३० रूपयांचा निधी येत्या ३१ मार्च पर्यंत खर्च करावयाचा आहे. याबाबत राज्य शासनाच्या नियोजन विभागाने आदेश दिले असून असे न झाल्यास निधी परत जाणार आहे.शहरातील सुर्याटोला परिसरातील तलावाच्या सौंदर्यीकरणाची मागणी परिसरातील जनतेकडून केली जात होती. त्यानुसार सौंदर्यीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये नावीण्यपूर्ण योजनेतून तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी ८९ लाख ६९ हजार ५३० रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र जिल्हा परिषद बांधकाम विभागाने या कामासाठी ज्याप्रकारे पाऊल उचलने गरजेचे होते त्यानुसार काम केले नाही. परिणामी जुन्या मालगुजारी तलाव सुर्याटोलाच्या गट क्रमांक ३३० च्या सौंदर्यीकरणाचे काम पुढे वाढू शकले नाही.आता ८ जून रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या आमसभेत या कामाची निविदा मंजूर करण्यासाठी प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यामुळेच आता हा निधी ३१ मार्च पर्यंत खर्च करण्याचे आदेश देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, सौंदर्यीकरणाचे हे काम लंबीत होण्यामागे जिल्हा परिषदेची लचर कार्यप्रणाली जबाबदार आहे. याशिवाय, तलावाच्या जागेवर कित्येकांनी अतिक्रमण केले. एवढेच नव्हे तर तलावाच्या जागेवर घरांचे बांधकामही करण्यात आल्याचे सांगीतले जात आहे. तर तलावाच्या जागेची खरेदी-विक्रीही करण्यात आली आहे. यामुळेही तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाला उशीर लागला. मात्र आता २७ आॅगस्ट रोजी शासनाने आदेश काढले असून ३१ मार्च पर्यंत निधी खर्च करण्याची मुदत दिली आहे.सौंदर्यीकरणात होणार ही कामेतलावाच्या सौैंदर्यीकरणांतर्गत सुरक्षा भिंतीचे बांधकाम केले जाणार आहे. तसेच पिचींग, पेवींग ब्लॉक, बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था, तलावात उतरण्यासाठी पायऱ्यांचे बांधकाम केले जाईल. तसेच हा परिसर हिरवागार रहावा यासाठी वृक्षारोपण करून तलावाचा परिसर लोकांना फिरण्यायोग्य बनविला जाणार आहे. ही सर्व कामे झाल्यास परिसरातील लोकांना ही जागा फिरण्यासाठी उपयुक्त ठरणार असून येथे भविष्यात गर्दी वाढणार. शिवाय काही वर्षांनी येथे नाव चालविल्यास आश्चर्याची बाब ठरणार नाही.
३१ मार्चपर्यंत निधी खर्च करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 9:42 PM
शहरातील सुर्याटोला परिसरातील तलावाच्या सौंदर्यीकरणाचा ८९ लाख ६९ हजार ५३० रूपयांचा निधी येत्या ३१ मार्च पर्यंत खर्च करावयाचा आहे. याबाबत राज्य शासनाच्या नियोजन विभागाने आदेश दिले असून असे न झाल्यास निधी परत जाणार आहे.
ठळक मुद्देशासनाचे अल्टिमेटम : अन्यथा तलावाचा निधी जाणार परत