लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील ४ महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे रक्तदाते सुद्धा रक्तदान करण्यास घाबरत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा पडला आहे. हीच बाब लक्षात घेत ‘लोकमत’ समुहाने ‘लोकमत’चे संस्थापक व स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी (दि.२) येथील ‘लोकमत’ जिल्हा कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदात्यांनी पुढे येत स्वंयस्फूर्तपणे रक्तदान केले.‘दानात दान महादान म्हणजे रक्तदानाचे’ कार्य होय. आपल्या रक्तदानाने मृत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीचे जीवन फुलते. या दानापेक्षा दुसरे मोठे दान नाही. ‘लोकमत’तर्फे विविध सामाजिक कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. त्यातच सामाजिक बांधिलकी जपत ‘लोकमत’ समुह आणि बीजीडब्ल्यू शासकीय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘लोकमत’चे संस्थापक व स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी प्रामुख्याने ‘लोकमत’ जिल्हा कार्यालय प्रमुख मिलिंद वाढई, ‘लोकमत’ जिल्हा प्रतिनिधी अंकुश गुंडावार, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी मुकेश शर्मा, डॉ. सुवर्णा हुबेकर, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. पल्लवी गेडाम, रक्तपेढी तंत्रज्ञ निलेश राणे, प्रशांत बोरकर, जनसंपर्क अधिकारी अनिल गोंडाणे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य (बाबूजी) यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ‘लोकमत’ नेहमीच सामाजिक बांधिलकीतून अनेक उपक्रम राबवित असतो. सखी मंच, बाल विकास मंच व युवा नेक्स्टच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविते. यामाध्यमातून समाजमन घडविण्याचे कार्य ‘लोकमत’ करीत आहे. ‘लोकमत’चा ठसा वाचक वर्गावर असून विविध उपक्रमांतून समाजमन घडविण्याची ‘लोकमत’ची तळमळ समाजात दिसत असल्याचे सांगितले. शासकीय नियम तसेच मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करुन रक्तगट, हिमोग्लोबीन, रक्तदाब तपासणी करून रक्तदानास सक्षम असलेल्या अनेकांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान केले. संचालन करून आभार श्रीकांत पिल्लेवार यांनी मानले. शिबिरासाठी सखी मंच जिल्हा संयोजिका ज्योत्सना सहारे, कपिल केकत,ललीता ताराम, दीपा काशिवार, कल्पना गोरखे, अर्चना ठवरे, रक्तपेढीच्या परिचारिका सृष्टी मुरकुटे, रक्तदूत राजू रहांगडाले, तुषार तुरकर, वाहन चालक विनोद बन्सोड, अजय दमाहे यांनी सहकार्य केले.खालसा सेवा दल सदस्यांचा सेवाभाव‘लोकमत’ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील खालसा सेवा दलच्या सदस्यांनी स्वयंस्फूर्तपणे पुढे येत रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जपली. तसेच ‘लोकमत’च्या सर्वच विधायक कार्याला सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी दिली. खालसा सेवा दलचे वीजंदरसिंग मान, हरदिपसिंग मान, प्रित कौर मान, हर्षा हरचंदानी, दिलराज कौर मान, कमलजीत कौर मान, रविदसिंग मान, दलजितसिंग मान, जतीन हरचदांनी, दिव्या हरचदांनी, जया हरचदांनी यांनी यावेळी रक्तदान केले.यांनी केले महादानरवी कावळे, अतुल धांडे, मंगेश विटणकर, दीपा काशीवार, घनश्याम गेडेकर, पंकज बोरकर, अर्पित बन्सोड, संजय उके, हितेश रहांगडाले, दिप्ती भाजीपाले, अजय दमाहे, सचिन कावळे यांच्यासह इतर रक्तदान केले केले. जयंती निमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामुळे गरजूंना रक्त मिळण्यास मदत होणार आहे.
रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 5:00 AM
‘दानात दान महादान म्हणजे रक्तदानाचे’ कार्य होय. आपल्या रक्तदानाने मृत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीचे जीवन फुलते. या दानापेक्षा दुसरे मोठे दान नाही. ‘लोकमत’तर्फे विविध सामाजिक कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. त्यातच सामाजिक बांधिलकी जपत ‘लोकमत’ समुह आणि बीजीडब्ल्यू शासकीय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘लोकमत’चे संस्थापक व स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले.
ठळक मुद्देस्व.जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जंयतीचे औचित्य : ‘लोकमत’ने जपली सामाजिक बांधिलकी