प्राचार्य रिता खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात हाऊसहोल्ड बायोलाॅजी विभागाच्या प्रमुख डॉ. छाया लंजे यांनी जागतिक विज्ञान दिवसाचे औचित्य साधून ही चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. मुलींमध्ये चित्रकलेबद्दल आवड निर्माण करणे, महामारी पसरवणाऱ्या कोरोना विषाणूबद्दल माहितीचे संकलन करून घेणे, विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर सांगण्याचे कौशल्य निर्माण करणे हा या चित्रकला स्पर्धेचा उद्देश होता. यात अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मुलींनी चित्रांची मांडणी केली. चित्रकलेचे मूल्यांकन एम.बी.पटेल महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. विरेंद्र सांगोडे यांनी विद्यार्थिनींना चित्रांशी संबंधित प्रश्न विचारून केले. विद्यार्थिनींना बक्षीस देऊन गौरविण्यात आले तसेच त्यांचे प्रोत्साहन वाढविण्यात आले. स्पर्धेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. रोहित महादुले, प्रा. आशिष रंगारी, प्रा. संजोग शेंडे, प्रा. जांभुळे व इतर प्राध्यापक आणि विद्यार्थिनींनी सहकार्य केले.
चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 4:27 AM