लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरात झपाटयाने वाढत असलेल्या कोरोना रूग्णांच्या संख्येला घेऊन सर्वच दहशतीत वावरत आहेत. अशात यावर नियत्रंण मिळविणे आता गरजेचे झाले असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला बाजारपेठेत उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे रविवारी (दि.१३) दिसून आले. शहरातील बाजारपेठेत जनता कर्फ्यू अंतर्गत कडकडीत बंद दिसून आला. यातून व्यापाऱ्यांनी आपल्या एकतेचा परिचय दिल्याचे दिसून आले.जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भयावह रूप धारण करीत आहे. यात गोंदिया शहराची स्थिती अधिकच गंभीर असून जिल्ह्यात आतापर्यंत मिळून आलेल्या रूग्णांमध्ये सर्वाधिक रूग्ण शहरातील आहेत. आजघडीला जिल्ह्यात ३०७८ कोरोना बाधित रूग्ण संख्या असून ४६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातही सप्टेंबर महिन्यातील या १२ दिवसांत तब्बल १५९२ रूग्ण आढळून आले असून २५ जणांना जीव गेला आहे. सातत्याने वाढत असलेल्या या रूग्ण व मृत्यू संख्येमुळे शहरवासी चांगलेच घाबरून आहेत. एकप्रकारे कोरोनाच्या मानसिक दबाबात सर्वांचा वावर सुरू असल्याचे दिसत आहे.ही परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी कोरोनाची साखळी तोडणे गरजेचे असून यावर एक उपाययोजना म्हणून शहरातील बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांनी पुढाकार घेत जनता कर्फ्यूसाठी प्रयत्न सुरू केले. बाजारपेठेतील व्यापारी व व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून शहरात रविवारपासून (दि.१३) पुढील रविवारपर्यंत (दि.२०) जनता कर्फ्यू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या या प्रयोगाला व्यापारी संघटनांनी समर्थन दिले व व्यापाऱ्यांच्या एकतेचा चांगलाच परिचय रविवारी (दि.१३) शहरातील बाजारपेठेत बंदच्या रूपात मिळून आला.रविवारपासून सुरू झालेल्या या जनता कर्फ्यू अंतर्गत पहिल्याच दिवशी बाजारात कडकडीत बंद दिसला. सुमारे ९५ टक्के व्यापाºयांनी आपल्या दुकानी बंद ठेवून जनता कर्फ्यूला आपले समर्थन दाखवून दिले.शहरातील अन्य भागात बंद नाहीशहरातील स्थिती नियंत्रणात यावी यासाठी व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या स्वयंस्फुर्त जनता कर्फ्यूला बाजारपेठेत चांगला प्रतिसाद दिसून आला. सुमारे ९५ टक्के बाजारपेठ रविवारी जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी बंद दिसली. असे असतानाच मात्र शहरातील अन्य भागात दुकानी सुरू असल्याचे दिसून आले. यावरून कोरोना विरूद्धच्या या लढ्यात बाजारपेठेतील व्यापारीच उतरले काय असा प्रश्न पडतो. शहराची स्थिती गंभीर असल्याने ती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असाताना बाजारपेठ सोडून अन्य भागात जनता कर्फ्यू दिसून आला नाही.बाजारपेठेत गर्दी दिसली नाहीबाजारपेठ सुरू राहत असल्याने एरवी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती. मात्र रविवारी जनता कर्फ्यूमुळे बाजारपेठ बंद होती व परिणाणी बाजारात गर्दी दिसून आली नाही. बाजारातील रस्त्यांवर थोड्याफार प्रमाणात नागरिक दिसत होते. विशेष म्हणजे, २० तारखेपर्यंत असलेल्या या जनता कर्फ्यूत बाजारपेठ अशीच बंद राहिल्यास नक्कीच गर्दी कमी होऊन कोरोना परिस्थितीवर काही प्रमाणात तरी नक्कीच नियंत्रण मिळविता येईल, असे म्हणता येईल.
बाजारपेठेत स्वयंस्फूर्त कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 5:00 AM
जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भयावह रूप धारण करीत आहे. यात गोंदिया शहराची स्थिती अधिकच गंभीर असून जिल्ह्यात आतापर्यंत मिळून आलेल्या रूग्णांमध्ये सर्वाधिक रूग्ण शहरातील आहेत. आजघडीला जिल्ह्यात ३०७८ कोरोना बाधित रूग्ण संख्या असून ४६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातही सप्टेंबर महिन्यातील या १२ दिवसांत तब्बल १५९२ रूग्ण आढळून आले असून २५ जणांना जीव गेला आहे.
ठळक मुद्देव्यापारी एकतेचा परिचय : शहरातील अन्य भागांत मात्र प्रतिसाद नाही