लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : भारतीय शेतकºयांच्या वर्तमान परिस्थितीमध्ये शेतीचा लागवड खर्च उत्पन्नापेक्षा जास्त होत आहे. त्या खर्चामुळे शेती परवडत नाही. ती काही कमी खर्चात करता येईल यासाठी शेतीतील शून्य मशागत तंत्रज्ञानाची गरज आहे. याकरीता एसआरटी (झिरो बजेट) पध्दती उपयोगात आणावी, असे मार्गदर्शन कृषीभूषण चंद्रशेखर भडसावळे यांनी येथे आयोजित कार्यक्रमात केले.कृषी उत्पन्न बाजार समिती सडक-अर्जुनीच्या वतीने त्रिवेणी हायस्कूल सडक-अर्जुनी येथे शेती शून्य मशागत तंत्र ज्ञानाची कार्यशाळा (एसआरटी) झिरो बजेट आयोजित करण्यात आली होती. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन पं.स.सडक-अर्जुनीच्या सभापती कविता रंगारी यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पर्यटन व झिरो बजेट शेतीचे प्रणेते सगुना बाग, नेरळ जि. रायगड चे कृषीभूषण चंद्रशेखर भडसावळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य रमेश चुºहे, जि.प.सदस्या शिला चव्हाण, माजी जिल्हा कृषी अधिक्षक मनोहर चंद्रिकापुरे, को-आॅपरेटीव्ह बँकेचे संचालक गजानन परशुरामकर, जिल्हा कृषी अधिक्षक अनिल इंगळे, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, उपप्रादेशिक आदी.वि.महा.म.पाटील, कृषी विभाग देवरीचे उपविभागीय अधिकारी कोटांगले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. अविनाश काशीवार, संचालक हिरालाल चव्हाण, मिताराम देशमुख, देवचंद तरोणे, दिलीप गबने, वसंत गहाणे, डॉ. रुखीराम वाढई, गंगाधर सोनवाने, रतिराम कांबळे, रोशन बडोले, सुखदेव कोरे, गिरधारी हत्तीमारे, शोभा परशुरामकर, छाया मरस्कोल्हे, चंद्रप्रभा मरस्कोल्हे उपस्थित होते.भडसावळे म्हणाले, जमिनीची एकदा मशागत केली तर ती २० वर्षापर्यंत मशागत न करता आपल्याला उत्पादन घेता येते हीच पध्दत म्हणजे एसआरटी होय, आपल्या अध्यक्षीय भाषणात जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर म्हणाले या पध्दतीचा शेतकºयांनी एकदा उपयोग करुन पाहिल्यास त्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल असे सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे भात केंद्र सौंदड, सहकारी शेतकरी खरेदी विक्री देवरी, आदिवासी सहकारी संस्था कनेरी, आदिवासी सहकारी संस्था डोंगरगाव यांना लॅपटॅप वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अविनाश काशिवार यांनी तर संचालन आभार डॉ. रुखीराम वाढई यांनी मानले, संस्थेचे सचिव संजय पुस्तोडे यांनी सहकार्य केले.
कमी खर्चात जास्त उत्पादनासाठी एसआरटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 11:45 PM
भारतीय शेतकºयांच्या वर्तमान परिस्थितीमध्ये शेतीचा लागवड खर्च उत्पन्नापेक्षा जास्त होत आहे. त्या खर्चामुळे शेती परवडत नाही. ती काही कमी खर्चात करता येईल यासाठी शेतीतील शून्य मशागत तंत्रज्ञानाची गरज आहे.
ठळक मुद्देकृषी कार्यशाळेत झिरो बजेटचे मार्गदर्शन : परिसरातील शेतकºयांची उपस्थिती