लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : देवरी येथून प्रवाशी घेऊन आमगावकडे जाणारी एसटी बस रस्त्याच्या बांधकामामुळे उलटल्याने १ गंभीर तर ३० प्रवाशी जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.५) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास देवरी आमगाव मार्गावरील अंजोरा-बोरकन्हार जवळ घडली.सध्या शेतीची कामे सुरू असल्याने शेतात काम करीत असलेल्या शेतकरी आणि मजुरांनी घटनास्थळी धाव घेत एसटी बसमधील जखमींना बाहेर काढले.जखमींमध्ये श्रीचंद मनीराम बनकर (६०) रा. पुराडा, नागेश राठोड (४२) रा. साखरीटोला, बालचंद मिरुगवार, रा.गोरेगाव, मुस्कान दुबे (१०) रा. अंजोरा आदींचा जखमींमध्ये समावेश आहे.तर अन्य प्रवाशी किरकोळ जखमी झाले.गोंदिया आगाराची देवरी-आमगाव बस क्रमांक एमएच ०७,९०९७ ही बस देवरी येथून प्रवाशी घेऊन शनिवारी सकाळी १० वाजता निघाली.दरम्यान ही बस नादुरूस्त असल्याने काही अंतरावर येऊन बंद पडली. त्यानंतर प्रवाशांनी धक्का देऊन बस सुरू केली. मागील काही महिन्यांपासून देवरी-आमगाव या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. रस्ता बांधकामासाठी एका बाजुला रस्ता खोदला असल्याने आमगावकडे बस जात असताना अंजोरा-बोरकन्हारजवळ रस्त्याच्या कडेला बस उलटली.बसमध्ये जवळपास ५० प्रवाशी होते.यात आमगाव येथील भवभूती विद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सध्या खरीप हंगामातील धानाचे निंदन काढण्याचे काम सुरू आहे.अंजारा-बोरकन्हारजवळ शेतात काम करीत असलेल्या मजुरांना बस उलटल्याचे लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढले. तसेच जखमी सातगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.दरम्यान पाच प्रवाशांना सालेकसा आणि गोंदिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.सुदैवाने कुठलीही जीवीत हानी झाली नाही.घटनेची माहिती मिळताच आमगाव पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.सुशिलकुमार नेवारेने वाचविले प्रवाशांचे प्राणज्या ठिकाणी बस उलटली त्याला लागूनच अंजोरा येथील सुशिलकुमार नेवारे यांचे शेत आहे. ते शेतात काम करीत होते. बस उलटल्याचे त्यांना दिसताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत बसमध्ये फसून असलेल्या २० ते २५ प्रवाशांना बाहेर काढले. तसेच शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यांना जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली.सुशीलकुमार नेवारे यांनी वेळीच मदत केल्याने प्रवाशांचे प्राण वाचविणे शक्य आहे.चिखलाने माखले प्रवाशीदेवरी-आमगाव मार्गावरील अंजोरा-बोरकन्हार जवळ ज्या ठिकाणी बस उलटली तिथे मोठ्या प्रमाणात चिखल असल्याने या चिखलाने बसमधील प्रवाशी माखले होते. त्यामुळे बºयाच प्रवाशांचे कपडे खराब झाल्याने त्यांना आपला नियोजीत स्थळी न पोहचता घरी परत जावे लागले.नादुरूस्त बसेसची दखल कोण घेणार?एसटी महामंडळाच्या अनेक बसेस जीर्ण झाल्या असूनही त्या रस्त्यावरुन धावत आहे.जीर्ण बसेसमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला असून नादुरूस्त बसेसची दखल कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.कंत्राटदाराचे दुर्लक्षमागील सात आठ महिन्यापासून आमगाव-देवरी मार्गाच्या चौपदरीकरण आणि सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र कंत्राटदाराने एका बाजुने रस्ता खोदून मुरूम टाकले आहे.त्यामुळे या मार्गावरुन वाहने काढताना बरेचदा अपघात होत आहे. कंत्राटदाराने याची वेळीच दखल घेऊन उपाय योजना करण्याची गरज आहे.मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.
एसटी बस उलटल्याने १ गंभीर, ३० प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 6:00 AM
ही बस नादुरूस्त असल्याने काही अंतरावर येऊन बंद पडली. त्यानंतर प्रवाशांनी धक्का देऊन बस सुरू केली. मागील काही महिन्यांपासून देवरी-आमगाव या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. रस्ता बांधकामासाठी एका बाजुला रस्ता खोदला असल्याने आमगावकडे बस जात असताना अंजोरा-बोरकन्हारजवळ रस्त्याच्या कडेला बस उलटली.बसमध्ये जवळपास ५० प्रवाशी होते.
ठळक मुद्देप्रवासी थोडक्यात बचावले। रस्त्याच्या कामामुळे झाला अपघात : बसेस नादुरुस्त