लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात मागील तीन वर्षात मोठे परिवर्तन झाले आहे. परिवर्तनाचा एक भाग म्हणून एस.टी.ने सुद्धा कात टाकली आहे. राज्यात २ हजार वातानुकूलित बसेस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून गोंदियावरुन नागपूरकरीता सुरु होणारी शिवशाही वातानुकूलीत बससेवा ही त्याचाच एक भाग आहे. एस.टी.ही राज्यातील प्रवासाचे महत्वाचे साधन आहे. त्यामुळे प्रवाशांना चांगली सेवा एस.टी.ने दयावी अशी अपेक्षा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली.रविवारी गोंदिया बसस्थानक येथे गोंदिया-नागपूर या वातानुकूलीत बससेवेला सुरूवात करण्यात आली. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे, भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केलनका, एस.टी.चे भंडारा विभाग नियंत्रक गजानन नागूलवार, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, गोंदिया आगार प्रमुख जयकुमार इंगोले, नंदकुमार बिसेन उपस्थित होते. लवकरच गोंदिया येथून शिर्डी, कोल्हापूर आणि रायपूरसाठी बससेवा सुरु करणार असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, या लांब पल्ल्याच्या सेवेमुळे प्रवाशांना सुविधा मिळण्यास मदत होईल. एस.टी. कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबीत प्रश्न आहेत. त्यांची निश्चित सोडवणूक करण्यात येईल असे सांगितले. जिल्हाधिकारी काळे म्हणाले, गोंदिया हा राज्याच्या टोकावर असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातील नागरिकांना नागपूर या उपराजधानीत रस्त्याने सुखकर पोहोचण्यासाठी ही शिवशाही वातानुकूलीत बससेवा एस.टी.ने सुरु केली आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार असल्याचे सांगितले.
एस.टी.ची प्रवाशांना चांगली सेवा मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 9:07 PM
राज्यात मागील तीन वर्षात मोठे परिवर्तन झाले आहे. परिवर्तनाचा एक भाग म्हणून एस.टी.ने सुद्धा कात टाकली आहे. राज्यात २ हजार वातानुकूलित बसेस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून गोंदियावरुन नागपूरकरीता सुरु होणारी शिवशाही वातानुकूलीत बससेवा ही त्याचाच एक भाग आहे.
ठळक मुद्देपालकमंत्री बडोले : शिवशाही वातानुकूलित बससेवेला सुरूवात