गोंदिया : ‘कशाला करता विषाची परीक्षा, एसटी बरी खासगीपेक्षा’ या म्हणीनुसार जिल्हावासी राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या एसटीवरच भरवसा ठेवत प्रवासासाठी तिलाच प्राधान्य देतात. जिल्ह्यात काही खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून जिल्हा अंतर्गत व जिल्हाबाह्य फेऱ्या चालविल्या जातात. मात्र, एसटीच्या फेऱ्या दिवसभर असल्याने जास्त पैसे मोजून, तसेच सुरक्षित प्रवासाची हमी सोडून खासगी वाहनांतून प्रवासाला प्रवासी पसंती देत नाही. आता लांब पल्ल्यासाठी महामंडळाच्या गाड्याही आरामदायी असल्याने प्रवाशांची त्यांनाच पसंती दिसते.
-------------------------------
जिल्ह्यात झालेले अपघात
एसटी ट्रॅव्हल्स
२०१८ २९ ८
२०१९ २९ ५
२०२० १४ ३
२०२१ (जुलैपर्यंत) ०० ००
------------------------------
एसटी व ट्रॅव्हल्सलाही स्पीड लॉक
उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमानुसार, एसटी असो वा ल्सगी ट्रॅव्हल्स प्रत्येकालाच स्पीड लॉक लावले जाते. यामध्ये राज्य महामार्गावर धावणाऱ्या वाहनांसाठी ६० किलोमीटर प्रतितास, तर राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या वाहनांसाठी ८० किलोमीटर प्रतितास वेगावर स्पीड लॉक केले जाते.
---------------------------
आगार प्रमुखाचा कोट
आगारातून दिवसभर एसटीच्या फेऱ्या सुरू असतात, यामुळे प्रवाशांची सोय आहे, शिवाय आता लांब पल्ल्यासाठी शिवशाहीसारख्या आरामदायी गाड्या असल्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येतो. विशेष म्हणजे, एसटीचा प्रवास आरामदायी असतानाच सुरक्षित प्रवासाची हमी आहे. यामुळे एसटीलाच प्रवासासाठी पसंती दिली जाते.
- संजना पटले, आगारप्रमुख, गोंदिया.
------------------------------
सुरक्षित प्रवास महत्त्वाचा
जीवापेक्षा मोठे दुसरे काहीच नाही. यामुळे भरधाव वेगात निष्काळजीपणे धावणाऱ्या वाहनांत प्रवास करून, आपला जीव धोक्यात घालण्यात शहाणपण नाही. एसटीचा प्रवास सुरक्षित असतो, हे महत्त्वाचे आहे व आता तोही आरामदायी होत आहे. यामुळे कमी पैशांत सुरक्षित प्रवासाची हमी देणारी एसटीच बरी.
- बळवंत मेंढे (खातीया)
------------------------------
एसटीचा प्रवास सुरक्षित असून, आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुरक्षित प्रवास महत्त्वाचा आहे. आरामात प्रवासाची सोय असून, त्या प्रवासाला सुरक्षेची हमी नसल्यास आपला जीव धोक्यात घालण्याचा प्रकार आहे. यामुळे आपली जीव धोक्यात घालून प्रवास करण्यापेक्षा एसटीचा सुरक्षित प्रवास अधिक चांगला.
- बकाराम हुमे (आसोली)