लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवाळीच्या कालावधीत बाहेरगावी ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यातच ग्रामीण भागात प्रवासासाठी सुरक्षित वाहन म्हणून प्रवासी एस.टी.लाच प्राधान्य देतात. मात्र, मागील आठ दिवसांपासून एस.टी. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांना घेऊन संप पुकारला आहे. त्यामुळे एस.टी.ची वाहतूक पूर्णपणे ठप्प पडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत तर विभागाचे सुद्धा दरराेज सुमारे ४५ लाख रुपयांचे नुकसान हाेत आहे. भंडारा विभागांतर्गत भंडारा आणि गाेंदिया या दाेन जिल्ह्यांचा समावेश आहे. तुमसर, तिराेडा, गाेंदिया, पवनी साकाेली आणि भंडारा या सहा आगारांचा समावेश आहे. दहा दिवसांपूर्वी सर्वप्रथम तुमसर आगारातून संपाला सुरुवात झाली. हळूहळू सर्वच आगारात या संपाचे लाेण पाेहोचले. आता तुरळक बसेस सुरू असून प्रवाशांना माेठे हाल सहन करावे लागते. एरव्ही दिवाळीच्या दिवसात पाय ठेवायलाही बसस्थानकात जागा नसते. मात्र, एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसस्थानकावर शुकशुकाट दिसतो.
साडेतीन काेटी रुपयांचे एस.टी.चे नुकसान- भंडारा विभागांतर्गत येणाऱ्या सहा आगारात या संपामुळे दरराेज एस.टी. महामंडळाचे सुमारे ४५ लाख रुपयांचे नुकसान हाेत आहे.- दरराेज बसफेऱ्या रद्द हाेत असल्याने महामंडळाला नुकसान सहन करावा लागत आहे. दहा दिवसांपासून तुमसर आगार संपावर असल्याने दरराेजचे ७ लाख असे ७० लाख रुपये एकट्या तुमसर आगाराचे नुकसान झाले आहे.
एस.टी. कर्मचाऱ्यांच्या पदरात काय पडले- राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची २८ टक्के डीएची मागणी दिवाळीपूर्वीच मान्य झाली आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांना एक टक्के घरभाडे भत्ता देण्याची मागणी करण्यात येत हाेती, तिही मान्य झाली आहे.nइन्क्रिमेंटबाबत दिवाळीनंतर बैठक घेऊन यावर ताेडगा काढण्यात येणार आहे. यासाठीच आता संप सुरू आहे.
प्रवाशांच्या खिशाला फटका
- ऐन दिवाळीत एस.टी.चा संप सुरू असल्याने प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवाश करावा लागताे. त्यांचे दर आता दुप्पट झाल्याने माेठा फटका बसताे.
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या शनिवारपासून संप पुकारला आहे. सुरुवातीला केवळ तुमसर आगार या संपात सहभागी झाले हाेते तेव्हा फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र, आता भंडारा विभागातील सहाही आगारांतील कर्मचारी संपावर गेले आहे. अशा स्थितीतही काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने बससेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न आहे. एस.टी.चे सरासरी दरराेज ४५ लाखांचे नुकसान हाेत आहे.- डाॅ. चंद्रकांत वडसकर विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा