आॅनलाईन लोकमतगोंदिया : ‘कशाला करता विषाची परीक्षा, एसटी बरी खाजगी पेक्षा’ ही म्हण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेसाठी उपयुक्त ठरत असून यातूनच प्रवाशांचा एसटी सेवेवरील विश्वास व्यक्त होते. मात्र जिल्ह्यात याच एसटीमुळे घडलेल्या अपघातांत तिघांचा बळी गेला आहे. यास कधी एसटी चालकाचा तर कधी इतर वाहन चालकांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. मात्र मागील वर्षभरात (२०१७) गोंदिया जिल्ह्यातील दोन्ही आगारांतर्गत एसटीच्या एकूण तीन प्राणांतिक अपघातांची नोंद आहे.परिवहन महामंडळाच्या बस सेवेला रेल्वे प्रवासाप्रमाणेच प्रवाशांकडून पसंती दिली जाते. परिवहन महामंडळाचे गोंदिया जिल्ह्यात गोंदिया व तिरोडा असे दोन आगार आहेत. गोंदिया आगारातील बसेस एका दिवसात तब्बल ४०८ फेºया करतात. तर तिरोडा आगारातील बसेस एका दिवसात २०५ फेºया करतात. उन्हाळ्यात लग्नसराई व दिवाळीत गोंदिया आगाराला ९ ते १० लाख रूपयांचे महिन्याकाठी उत्पन्न मिळते, या सणांव्यतिरिक्त इतर महिन्यांत सुमारे पाच ते सात लाखांचे उत्पन्न मिळते. तर तिरोडा आगाराला दिवाळी व लग्नसराईत सुमारे पाच ते सहा लाख व इतर काळात अडीच ते तीन लाख रूपयांचे महिन्याकाठी उत्पन्न मिळते.परिवहन महामंडळाला उत्पन्न मिळवून देण्यासहच प्रवासी सेवा देणाºया एसटी बसेसला सुरक्षित प्रवासादरम्यानही कधीतरी अपघाताची झळ बसतेच. सन २०१७ च्या १ जानेवारी ते ३१ डिसेंबरदरम्यान गोंदिया आगारातील बसेसचे दोन व तिरोडा आगारातील बसचा एक असे एकूण तीन प्राणांतिक अपघात घडले आहेत. तर एकूण १० गंभीर अपघातांमध्ये गोंदिया आगाराचे पाच व तिरोडा आगारातील बसेसच्या पाच अपघातांचा समावेश आहे. याशिवाय वर्षभरात गोंदिया आगारातील बसेसचे सात व तिरोडा आगारातील बसेसचे चार असे एकूण ११ किरकोळ अपघात घडले आहेत.रस्ता सुरक्षा सप्ताहात मार्गदर्शनएसटीचे अपघात घडू नये, प्रवाशांना सुरक्षीत प्रवास करता यावा यासाठी दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करून वाहन चालक व वाहकांना मार्गदर्शन केले जाते. दरम्यान अधिकाºयांकडून वाहतुकीचे नियम व वाहन चालविताना घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले जाते. रस्त्यावरील झाड-झुडुपे हटविण्याचे निर्देशही दिले जातात. गरजेच्या ठिकाणी व वळणावर रिफ्लेक्टर लावण्याच्या सुचना दिल्या जातात. यावर्षी तिरोडा व गोंदिया आगारात ११ ते १७ जानेवारीपर्यंत रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. दरम्यान वाहतुकीच्या नियमांवर व वाहन चालविताना घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे दोन्ही आगारांच्या व्यवस्थापकांनी सांगितले आहे.
एसटीने घेतला तिघांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 8:54 PM
‘कशाला करता विषाची परीक्षा, एसटी बरी खाजगी पेक्षा’ ही म्हण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेसाठी उपयुक्त ठरत असून यातूनच प्रवाशांचा एसटी सेवेवरील विश्वास व्यक्त होते.
ठळक मुद्देगोंदिया व तिरोडा आगार : १० गंभीर तर ११ किरकोळ जखमी